भातगाव येथे दरड कोसळण्याची घटना, गुहागरात सर्वाधिक पावसाची नोंद
गुहागर, ता. 24 : गेली पाच दिवस सुरु असलेल्या अवकाळी पावसाने गुहागर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानकपणे आलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. अनेकांची घरांची आणि आगोटची कामे अपुरी राहिली आहेत. भातगाव येथे मार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली. रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यंत गुहागर तालुक्यात मि. मी. पाऊस पडून सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. Rain disrupts normal life in Guhagar


गेली पाच दिवस कोसळत असलेल्या पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात कोसळणारा पाऊस में महिन्यामध्ये जोरदार पडू लागल्याने सर्वांचीच तारांबल उडाली. गुहागरात मे महिना हा पर्यटन हंगाम असतो. हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. परंतु, अवकाळी पावसाने आलेल्या पर्यटकांनाही झोडपून काढले. याचा परिणाम येथील व्यवसायिकांवर झाला आहे. तसेच लग्न कार्याल देखील पावसाचा फटका बसले. लग्न मंडपात पावसाच्या पाण्याची धार लागलेले चित्र दिसतं आहे. काहींनी आगोटची कामे मार्गी लावलेली नाहीत. काही लोकांनी पावसाआधी घरवरील कौले झाडण्यासाठी काढलेली असताना पावसाने सर्वांची तारांबळ उडवली आहे. Rain disrupts normal life in Guhagar


वडद गावामध्ये गेले तीन दिवस वीज पुरवठा खंडित आहे. १५मिनिट सुद्धा वीज पुरवठा सुरळीत राहत नाही. पाण्याचे पंप चालत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. साखरी आगर धरणवाडी येथे घराबाजूची दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घरातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगण्यात आले आहे. मोडकाआगर ते रोहिले पर्यंत एअरटेलची केबल टाकली आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी दिली आहे. मात्र केबल टाकल्यानंतर तिथे रोलिंग करणे आणि रस्त्याचे गटार मोकळे करणे कंपनीला बंधनकारक असताना संबंधी अधिकाऱ्यांनी कुठेही रोलिंग केले किंवा गटार मोकळे केली नाहीत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कल्पना देऊन सुद्धा त्यांनी देखील यात लक्ष घातले नाही. त्यामुळे सर्व ठिकाणी अडचणी येतं आहेत. पाचेरी सडा बौध्दवाडी येथे दरड रस्त्यावर कोसळली होती. मंडळ अधिकारी श्री. काजरोळकर व तलाठी श्री. बरकडे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तत्काळ जेसीबी बोलावून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. Rain disrupts normal life in Guhagar