अवकाळी पाऊस जाताच मार्गावर कारपेट मारून द्या; पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
गुहागर, ता. 24 : गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर नाका ते शासकीय विश्रामगृह मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना दुरावस्था झालेल्या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाची दुरुस्ती व्हावी, यासाठी अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा दखल न घेतल्याने अखेर शहरातील संतप्त नागरिकांनी सकाळी 10. 30 वाजता शहरातील जुने मच्छि मार्केट येथील मार्गावर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर नागरिकांनी चिपळूण येथे जाऊन पालकमंत्री उदय सामंत व प्रांतधिकारी यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना अवकाळी पाऊस संपताच दुरावस्था झालेल्या रस्त्यावर कारपेट मारून त्यांची गैरसोय दूर करावी, अशा सूचना केल्या. Thiya agitation of Guhagar citizens


गुहागर नाका ते रेस्ट हाऊस या महामार्गांचे लांबीमध्ये पुर्णपणे खड्डे पडले असून सदर खड्डयांमध्ये नागरीकांना खुप त्रास होत आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सदर खड्डयांमुळे किरकोळ स्वरुपाचे अपघात होतं आहेत. या खड्ड्यांमध्ये अपघात होऊन जीवीत व वित्तहानी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. सर्व राजकीय पक्षातील नागरिकांनी आपल्याला पत्रव्यवहार केला आहे. पंरतू पत्रव्यवहार व्यतिरीक्त ठोस कारवाई होत नाही. म्हणून अमरदीप परचुरे, निलेश मोरे, दीपक परचुरे, शार्दूल भावे, हेमंत बारटक्के, मंदार पालशेतकर, ज्योती परचुरे, मंदार आठवले, अक्षय खरे, नितीन बेंडल, मनीष मोरे, विश्वास सोमण, मनीष खरे, अभिजित मर्दा, श्रीधर बागकर, उमेश भोसले, उदय आठवले, संतोष मावळणकर, प्रसाद बोले, केदार मालप, अमित मालप, अपर्णा आठवले, पराग मालप, संजय मालप, ज्योती परचुरे आदीसह अन्य ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. ग्रामस्थांनी 15 मिनिटे राष्ट्रीय महामार्गवरील गुहागर – चिपळूण मार्ग रोखून धरला. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. Thiya agitation of Guhagar citizens


दरम्यान, या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले. त्यांना नोटीस देवून सोडण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थ चिपळूण येथे जाऊन पालकमंत्री उदय सामंत आणि प्रांतधिकारी यांची भेट घेऊन सदरील परिस्थिती निदर्शनास आणून दिली. तसेच प्रांतधिकारी यांनी येत्या 15 ऑगस्ट पर्यंत भूसंपादन आणि मोबदल्याचा विषय मार्गी लावू आणि सप्टेंबर पासून कामाला सुरुवात करू, असे सांगितले. Thiya agitation of Guhagar citizens

