गुहागर, ता. 23 : तालुक्यातील विसापूर कारुळ येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री. बागुल भाऊ यांनी आपत्तीग्रस्त वाडीमध्ये जाऊन एकूण 63 कुटुंबांना नोटीस बजावले आहेत आणि या कुटुंबांना पावसाळ्यात संर्तक सावधान राहण्यासाठी व काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. गुहागर तहसील विभागाच्या वतीने सुद्धा आपत्तीग्रस्त 63 कुटुंबांना नोटीस देण्यात येणार असल्याचेही माहिती मिळाली आहे. Evacuation notice to disaster-affected families


काही वर्षांपूर्वी गुहागर तालुक्यातील विसापूर कारूळ येथील एक वाडी आपत्तीग्रस्त झाली होती. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी तेथील ग्रामस्थांना पावसाच्या वेळेला स्थलांतराच्या नोटीस देण्यात आले होत्या. आता पाऊस सुरू होऊन काही दिवस झाले असून ग्रामपंचायत विसापूर कारुळच्या वतीने याही वर्षी आपत्ती ग्रस्त असलेल्या वाडीतील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होणे बाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. Evacuation notice to disaster-affected families

