• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अवकाळी पावसाने अनेकांचे नुकसान

by Guhagar News
May 22, 2025
in Guhagar
128 1
0
Damage to electrical equipment due to lightning strikes
251
SHARES
717
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वीज कोसळून सर्वाधिक विदयुत उपकरणांची नुकसानी

गुहागर, ता. 22 : शहरातील खालचापाट येथील एका घराशेजारी वीज कोसळून घरातील विजेची उपकरणे जळून खाक झाली आहेत. या घटनेत घर मालकाचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे. ही घटना काल मंगळवारी सायंकाळी घडली. तसेच तालुक्यातील अन्य ठिकाणीही वीज कोसळण्याच्या व झाडे पडण्याच्या घटना घडल्या. Damage to electrical equipment due to lightning strikes

Damage to electrical equipment due to lightning strikes

मंगळवारी सायंकाळी कोसळलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांना मोठा फटका बसला आहे. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामध्ये शहरातील खालचापाट येथील चैताली मेडिकलचे मालक अरुण ओक यांच्या घराशेजारी वीज कोसळल्याने दोन घरगुती, एक व्यावसायिक वीज मीटर जळून गेला आहे. चार पंखे, इन्व्हर्टर सुद्धा जळाला आहे. सद्या महावितरण कंपनीकडे वीज मीटर उपलब्ध नसल्याने ओक व तालुक्यातील इतर वीज ग्राहकांना अंधारात चाचपडत रहावे लागणार आहे. साखरी आगर येथील विकास कदम यांच्या घरावर वीज कोसळून विदयुत सर्व्हिस वायरचे तुकडे दिले आहे. पाळकोट त्रिशूल येथे पिण्याच्या पाण्याची विहीर कोसळण्याची घटना घडली आहे. चिखली बौध्दवाडी येथे काजूचे झाड पडून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. Damage to electrical equipment due to lightning strikes

Tags: Damage to electrical equipment due to lightning strikesGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share100SendTweet63
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.