• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळीत काँक्रीट गटारे मोकाट गुरांसाठी जीवघेणी

by Ganesh Dhanawade
May 21, 2025
in Guhagar
186 2
0
Sewers are deadly for stray cattle
365
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

निकृष्ट बांधकामाचा परिणाम, मनसेचे प्रसाद कुष्टे यांचा आक्रमक पवित्रा

गुहागर, ता. 21 :  तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात रस्त्याच्या दोनही बाजूने काँक्रीट गटारे बांधण्यात आली. मात्र, त्यांची कामे अर्धवट व निकृष्ट झाल्याने या गटारात मोकाट जनावरे पडून ती जखमी होत आहेत. याविरोधात गुहागर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे यांनी संताप व्यक्त करुन निकृष्ट बांधकामाविरुध्द आंदोलनाचा इशारा दिला आहे. Sewers are deadly for stray cattle

गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी जानवळे फाटा ते मच्छी मार्केटपर्यंत रस्त्याच्या दोनही बाजूने काँक्रीटची गटारे बांधण्यात आली. काही गटारांची कामे अर्धवट ठेवण्यात आली तर काही जी पूर्ण झाली त्यांची बांधकामे निकृष्ट झाली आहेत. काँक्रीट पडून लोखंडी सळ्या बाहेर येणे, मध्येच काँक्रीटला तडे जाणे व बांधकाम ढासळणे असे प्रकार सुरु आहेत. मध्यंतरी गटारात माणसेही पडण्याचे प्रकारही घडलेले आहेत.  Sewers are deadly for stray cattle

शनिवारी हाँटेल कोकणरत्न समोर काँक्रीट गटारात एक वासरु पडून अडकले आणि जखमी झाले. अशावेळी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी बाबू तेलगडे व काही नागरिकांनी या वासराला बाहेर काढले. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे येथील काँक्रीट गटारे जीवघेणी ठरली असून अर्धवट गटारांची कामे पूर्ण करुन जी तुटलेली आहेत त्यांचीही दुरुस्ती व्हावी, अन्यथा आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा प्रसाद कुष्टे यांनी दिला आहे. Sewers are deadly for stray cattle

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSewers are deadly for stray cattleUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share146SendTweet91
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.