गुहागर, ता. 21 : तालुक्यात विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामध्ये गुहागर तालुक्यातील भातगाव, पिंपर, हेदवी येथे घरांवर वीज पडून विदयुत उपकारणे जळून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. तसेच तालुक्यातील अन्य गावांमध्येहि वीज कोसळून नुकसान झाले आहे. मात्र, त्याची कोणती नोंद झालेली नाही. Rain accompanied by lightning in Guhagar


यावर्षी उन्हाच्या उकाड्यात पावसाने लवकरच हजेरी लावली आहे. गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना अचानक कोसळलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, या पावसासोबत विजांच्या कडकडाटाने मोठी नुकसानी केली आहे. मंगळवारी सायंकाळी मौजे भातगाव धक्का (गोळेवाडी ) येथील श्रीम. वनिता रामचंद्र गावडे यांच्या घरावर वीज कोसळून विजेचे बोर्ड, वायरिंग याचे नुकसान झाले आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच पिंपर येथील श्रीम.सुवर्णा शशिकांत मोरे यांच्या घरावर देखील वीज पडून सगळे विद्युत उपकरण जळली आहेत. त्यात कुठलीही जीवितहानी नाही. हेदवी बेलवाडी येथील नारायण भिकाजी कुवारे यांच्या राहत्या घराच्या शेजारी वीज पडल्यामुळे त्यांच्या घरातील विजेच्या उपकरण तसेच वायरींगचे अंदाजे 18 हजाराचे नुकसान झाले आहे. Rain accompanied by lightning in Guhagar

