• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळीत सर्वधर्मीय तिरंगा रँली

by Guhagar News
May 19, 2025
in Guhagar
198 2
0
All religious Tiranga rally in Shringartali

शृंगारतळीत काढण्यात आलेली रॅली

390
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सैन्य दलाच्या समर्थनार्थ घोषणा, शहीद जवानांना श्रध्दांजली

गुहागर, ता. 19 : काश्मीर पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ल्याचा निषेध व दहशतवादांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या आँपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानाकडून प्रत्युत्तर म्हणून झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शृंगारतळीत सर्वधर्मीय तिरंगा रँली काढण्यात आली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद.. हिंदुस्तान जिंदाबाद, भारतीय जवानांचा विजय असो.. अशा घोषणा देण्यात आल्या. All religious Tiranga rally in Shringartali

All religious Tiranga rally in Shringartali
रॅली मध्ये सहभागी झालेले सर्व पक्षीय व सर्व धर्मीय नागरिक

काही दिवसांपासून राज्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ व भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ अनेक जिल्ह्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. All religious Tiranga rally in Shringartali

रविवारी शृंगारतळीत तिरंगा रँली काढण्यात आली. तिरंगा रँली जानवळे फाटा ते शृंगारतळी बाजारपेठ मधून निळकंठेश्वर मंदिर अशी काढण्यात आली. या रॅलीमध्ये भाजपाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे, भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर, माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विवेक गाणू, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, विठ्ठल भालेकर, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, यशवंत बाईत, जया साळवी, अपूर्वा बारगोडे, श्रद्धा घाडे, गौरव वेल्हाळ, डॉ.मंदार आठवले, वसंत ताम्हणकर,  विनोद चाळके आदीसह तालुक्यातील सर्वपक्षीय व सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते. All religious Tiranga rally in Shringartali

शृंगारतळी येथील श्री नीलकंठेश्वर मंदिर येथे रॅलीच्या सांगता कार्यक्रमात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जवानांच्या पाठिशी प्रत्येक नागरिक खंबीरपणे उभा आहे. देशाला लाभलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सर्व दौरे सोडून विमानतळावर उतरताच लष्करप्रमुखांच्या बैठका घेतल्या. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी जवानांचे मनोधैर्य वाढविले, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. यावेळी विवेक गाणू, राजेश बेंडल, सतीश मोरे यांची भाषणे झाली. शेवटी भाजपाचे गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. All religious Tiranga rally in Shringartali

Tags: All religious Tiranga rally in ShringartaliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share156SendTweet98
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.