• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अडूर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन

by Guhagar News
May 16, 2025
in Guhagar
182 2
0
Inauguration of Bharatiya Janata Party office in Adur
357
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील कोंडकारूळ जि. प. गटाच्या अडूर येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. Inauguration of Bharatiya Janata Party office in Adur

कोंडकारूळ जिल्हा परिषद गटातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी व विकास कामे करण्यासाठी मूळचे रहिवासी असलेले तरुण, तडफदार युवा कार्यकर्ते निलेश दाते यांनी हे कार्यालय सुरू केले आहे. निलेश दाते हे भाजपाच्या कोणत्याही पदावर नसताना देखील त्यांनी या कोंडकारूळ जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या सहा महिन्यात जवळजवळ १ कोटी ३५ लाखाची कामे मंजूर करून आणून ती पूर्णही केली आहेत. तसेच आताही आणखी ९० लाखाच्या कामांचे प्रस्ताव पाठवून ती सुद्धा कामे मंजूर झालेली आहेत. त्यामुळे त्यांनी गेल्या सहा महिन्यात या गटातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केल्याने त्यांच्यावर सर्वांनी विश्वास व्यक्त केला आहे. या उद्घाटन कार्यक्रमासाठी भाजपचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. Inauguration of Bharatiya Janata Party office in Adur

दाते यांनी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदतही मिळवून दिलेली आहे. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी निलेश दाते प्रतिष्ठानची स्थापना देखील नुकतीच केली असून त्या माध्यमातूनही ते अनेकांना मदत करणार आहेत. अशी त्यांची कामाची पद्धत असल्याने अनेक जण त्यांच्यासोबत आहेत. या जनसंपर्क कार्यालयात जनतेने संपर्क ठेवून आपल्या समस्या व विकासकामे करून घ्यावीत, असे आवाहनही निलेश दाते यांनी केले आहे. Inauguration of Bharatiya Janata Party office in Adur

या कार्यक्रमासाठी गुहागर तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष हरिष वेल्हाळ, पालशेतचे माजी उपसरपंच महेश वेल्हाळ, नितिन कनगुटकर, पालशेत येथील आम्ही कोकणस्थचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास साळवी, महेश तोडणकर, सीताराम पटेकर, श्रीकांत वेल्हाळ, विपुल नार्वेकर, दिनेश देवळे, निलेश घाणेकर, विजय अवेरे, गोपाळ झगडे, अशोक देवळे, नवीनभाई पटेल, सुनिल झगडे, सुनिल कोपरकर, विनायक गुहागरकर,  श्रावणी पाटील, वंदना पावसकर व अनेक भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. Inauguration of Bharatiya Janata Party office in Adur

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of Bharatiya Janata Party office in AdurLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share143SendTweet89
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.