• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मकरंद पटवर्धन यांना सायकलदोस्त सन्मान

by Guhagar News
May 16, 2025
in Ratnagiri
58 0
0
Patwardhan gets Cycle Dost Award
113
SHARES
324
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 16 : येथील लहान मुलांमध्ये सायकलची गोडी लावण्यासाठी प्रभावीपणे काम करणारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे मकरंद पटवर्धन यांना बाळगोपाळांचा सायकलदोस्त सन्मान प्रदान करण्यात आला. किड्स सायक्लोथॉननिमित्त हा सन्मान माळनाका येथील तारांगण येथे सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या संकल्पनेतून प्रदान केला. Patwardhan gets Cycle Dost Award

श्री. पटवर्धन यांनी कोरोना कालावधीपासून दररोज सायकलिंगला प्रारंभ केला. गेल्या चार वर्षांत त्यांनी जवळपास ८००० किमी. सायकलिंग केले आहे. कोरोना काळामध्ये मिऱ्या बंदर येथे दररोज सायकलिंग करताना त्यांनी जोशी पाळंद, टिळक आळी, खालची आळी, मांडवी, भागातील बालदोस्तांनाही सोबत नेलं आणि त्यांना सायकलिंगचा गोडी लावली. सुरवातीला मुलगा अर्णव आणि नंतर सर्व बालदोस्त मंडळी मिऱ्या येथे सायकलिंग करू लागले. वाहतुकीचे नियम पाळून सायकलिंग कसे करावे, कुठलीही दुखापत न होता सायकल कशी चालवली पाहिजे याचे धडे त्यांनी मुलांना दिले. याकरिता सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी हे सन्मानपत्र तयार केले. Patwardhan gets Cycle Dost Award

याप्रसंगी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, डॉ. नितीन सनगर, दर्शन जाधव, विनायक पावसकर, ओंकार फडके, राकेश होरंबे, डॉ. राज कवडे, अमित पोटफोडे, सुहास ठाकुरदेसाई, धीरज पाटकर, विशाल भोसले, योगेश मोरे, संदीप पावसकर, नारायण पाटोळे, गजानन भातडे, आरती दामले, मृणाल वाडेकर, रुद्र जाधव, सचिन नाचणकर, नीलेश शहा, ओंकार कांबळी, प्रा. बाबासाहेब सुतार, समीर धातकर, केदार देवस्थळी, प्रसाद हातखंबकर, श्रीलेश शिंदे आदी आणि बालदोस्त, पालक उपस्थित होते. Patwardhan gets Cycle Dost Award

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPatwardhan gets Cycle Dost AwardUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share45SendTweet28
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.