सुरक्षा दलाची मोठी कारवाई
नवीदिल्ली, ता. 13 : जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई केली आहे. लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असून शोधमोहीम सुरूच आहे. Eradication of terrorists in Kashmir


शोपिया जिल्ह्यातील केलर येथील शुकरुच्या जंगलात हे दहशतवादी लपून बसले होते. या दहशतवाद्यांची खबर मिळताच भारतीय सैन्याने हा परिसर पूर्णपणे वेढला होता. भारतीय सैन्य जंगलात दहशतवाद्यांना शोधत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले आहेत. उर्वरित दहशतवाद्यांना सध्या शोध सुरु आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. Eradication of terrorists in Kashmir


जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. भारतीय जवानांनी लश्कर ए तोयबाच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. त्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले. परिसरात सर्च ऑपरेशन अद्यापही सुरूच आहे. पहलगाम हल्ल्याशी या दहशतवाद्यांचा संबंध आहे की नाही याबाबत नेमकी माहिती कळू शकलेली नाही. अधिकाऱ्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरच्या शुकरू केलर परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. परिसराला घेराव घातला. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांच्या गोळीबाराला जवानांनी प्रत्युत्तर दिले. यात कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. Eradication of terrorists in Kashmir