गुहागर, ता. 13 : तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण मा. विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. परिक्षेला एकूण 168 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 16 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले तर विशेष प्राविण्य विद्यार्थी 63, प्रथम श्रेणी विद्यार्थी 74, व्दितीय श्रेणी विद्यार्थी 26, पास श्रेणी विद्यार्थी 5. Guhagar High School 10th Result 100 percent


या हायस्कूलच्या अनघा अभय साटले हिने 96. 40 टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. समर्था मंदार मोरे याने 96.00 टक्के मिळवत द्वितीय क्रमांक, ओम दिपक देवकर याने 95. 80 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यालयाच्या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Guhagar High School 10th Result 100 percent

