गुहागर, ता. 12 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. Result of 10th exam tomorrow

काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. Result of 10th exam tomorrow

दरम्यान, दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या खेटी घालाव्या लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे. Result of 10th exam tomorrow