• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्ह्यातील संगणक परिचालक पाच महिने विना वेतन

by Ganesh Dhanawade
May 9, 2025
in Guhagar
66 0
0
जिल्ह्यातील संगणक परिचालक पाच महिने विना वेतन
129
SHARES
368
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आर्थिक कोंडीने हैराण, कामांचा मात्र वाढता बोजा

गुहागर, ता. 09 : जिल्ह्यातील संगणक परिचलाकांचे वेतन गेले पाच महिने रखडले आहे. नोव्हेंबर 2024 पासून वेतनापासून वंचित असून त्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस कामाचा बोजा वाढत असून प्रशासकीय पातळीवरून कामासाठी दबाव आणला जात आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक कोंडीसह मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. Computer operator without salary

रत्नागिरी जिल्ह्यातील 832 ग्रामपंचायतींमध्ये 135 पुरुष तर 277 महिला असे एकूण 412 संगणक परिचालक आहेत. बहुसंख्य संगणक प्रचालक या महिला आहेत. मात्र त्यांचे वेतन अनेक महिने थकविले गेल्याने त्यांची आर्थिक कोंडी होऊन त्यांच्यासमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. राज्य शासनाने लाडकी बहीण योजना आणली मात्र यावरच त्यांचे पैसे खर्च होत आहेत दुसरीकडे ग्रामीण भागात काम करणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. यापैकीच ग्रामपंचायत असणारे संगणक परिचालक आहेत. Computer operator without salary

या संगणक परिचालकांना मासिक 10 हजार वेतन आहे. या वेतन वाढीसाठी त्यांना कित्येक वर्ष झुंजावे लागले. वेतनवाढ काही  महिन्यांपूर्वीच झालेली असतानाच दुसरीकडे गेले सहा महिने वेतन रखडवून ठेवण्यात आले आहे. प्रत्येक संगणक परिचारकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार आहे त्यामुळे त्यांचा कामाचा ताण अगोदरच वाढलेला असताना त्यामध्ये तालुका प्रशासनाकडून नवनवीन कामे लादण्याचा प्रकार सुरू आहे. ऍग्रोस्टीकचे कामही संगणक परिचालकांनी प्रामाणिकपणे केले तरीही नोव्हेंबर 2024 पासून एकही वेतन झालेले नाही. Computer operator without salary

संगणक परिचालकांवर शासन व कंपनीकडून वारंवार वेगवेगळ्या प्रकारे होणारा अन्याय सुरूच आहे. कर्मचारी दर्जा व किमान वेतन आणि मासिक २० हजार रुपये मानधन मिळणे या प्रमुख मागण्या आहेत. कित्येक वेळा मोर्चे व आंदोलने झाली. यावर ग्रामविकास मंत्रालय नेहमीच आश्वासने देत आले आहे.  मात्र, अद्याप ही आश्वासने पूर्ण केलेली नसल्याने संगणक परिचालकांच्या नोकरीवर मोठा परिणाम होत आहे. Computer operator without salary

Tags: Computer operator without salaryGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share52SendTweet32
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.