रत्नागिरी, ता. 03 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात पाच दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेची सांगता नुकतीच झाली. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. Workshop at Dev, Ghaisas, Keer College

कार्यशाळेत प्रा. प्रशांत दिवेकर (ज्ञान प्रबोधिनी, पुणे) यांनी ‘अध्यापन-अधिगम उत्कृष्टतेतील संशोधन’ यावर मार्गदर्शन केले. प्रभावी अध्यापनासाठी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय) यांनी ‘अध्यापन-अध्ययन अनुभव’ यावर मार्गदर्शन करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी केंद्रित शिक्षणाचे विविध पैलू मांडले. Workshop at Dev, Ghaisas, Keer College
प्रा. पंकज घाटे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय) यांनी शिक्षकांसाठी अध्ययन साधने या विषयावर तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रा. विनायक गावडे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय) यांनी ‘अध्यापन शास्त्र : मूल्यमापनातून शिकणे’ या विषयावर संवादात्मक सत्र घेतले. प्रा. निशा केळकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय) यांनी विविध अध्यापन तंत्र, शैक्षणिक पद्धती व त्यांच्या उपयुक्ततेवर मार्गदर्शन केले. Workshop at Dev, Ghaisas, Keer College

समारोप सत्रासाठी प्रमुख अतिथी म्हणून गोगटे महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई उपस्थित होते. तसेच देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. वसुंधरा जाधव व समिती सदस्य, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेस भारत शिक्षण मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. सहभागी शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग, संवाद, आणि वैचारिक देवाण-घेवाण यामुळे ही कार्यशाळा अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी ठरली. Workshop at Dev, Ghaisas, Keer College