आम्ही भारतासोबत; तुम्ही पहलगाम हल्ल्याचा निषेध करा
नवीदिल्ली, ता. 01 : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना खडेबोल सुनावले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांची पाकच्या पंतप्रधानांशी चर्चा झाली. यावेळी पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध करावा, असं अमेरिकेने पाकिस्तानला म्हटलं आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानने मदत करावी, असं अमेरिकेने पाकिस्तानला सांगितलं आहे. America gave Pakistan strong words


अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या कठीण काळात भारताला उघडपणे पाठिंबा दिला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत उभा आहे, असंही मार्को रुबियो यांनी सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्यावरुन अमेरिकेशी चर्चा केली. यावेळी अमेरिकेने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना खडेबोल सुनावले. पहलगाम हल्ल्याच्या चौकशीत पाकिस्तानने सहकार्य करावे, असं अमेरिकेकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे. हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करणे आणि दोषींना शिक्षा करणे ही पाकिस्तानची जबाबदारी आहे, असंही अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. काल रात्री उशिरा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. यांच्याशी चर्चा केली. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी झालेल्या स्वतंत्र चर्चेत अमेरिकेचे दहशतवादाविरुद्धचे स्पष्ट धोरण स्पष्ट करण्यात आले. America gave Pakistan strong words


भारताच्या कारवाईची चांगलीच धास्ती पाकिस्तानने घेतली आहे. त्याचा परिणाम पाकिस्तान शेअर बाजारावर दिसून आला. बुधवारी पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला होता. ३२०० अंकांना पाकिस्तान शेअर बाजार घसरला होता. पाकिस्तानचे मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी भारत हल्ला करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद शेअर बाजारात दिसले. संयुक्त राष्ट्र संघाने भारत आणि पाकिस्तान दरम्यान मध्यस्थीचा प्रयत्न केला. दोन्ही देशांनी संघर्ष टाळावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्र संघाने केले आहे. दरम्यान, पाकिस्तानविरोधात भारताने कठोर भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पाच बैठका घेतल्या. त्या बैठकांमध्ये पाकिस्तानबाबत कारवाईसंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच सांगितले आहे. America gave Pakistan strong words