रत्नागिरी जिल्ह्यातील 4 पुलाचा समावेश, दोन पुलांच्या निविदा जूनमध्ये निघणार
मयूरेश पाटणकर, गुहागर
गुहागर, ता. 26 : कोकणातील मुंबई गोवा महामार्गाला पर्याय म्हणून बघितल्या जाणाऱ्या सागरी महामार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या तीन जिल्ह्यातील 8 खाडीपुलांपैकी 6 खाडी पुलांची निविदा प्रक्रिया पूर्ण होवून कामाला सुरवात झाली आहे. तर बाणकोट आणि दाभोळ खाडीपुलांच्या निविदा 7 जूनला उघडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे सागरी महामार्गाचे काम सुरु आहे. Commencement of work on bay bridges on marine highway


सद्यस्थिती
सागरी महामार्गावरील दाभोळ – धोपावे, तवसाळ – जयगड, वेस्वी – बागमांडला, दिघी – आगरदांडा ही खाड्यांच्या दोन्ही किनार्यावरील गावे फेरीबोटीने जोडलेली आहेत. या फेरी बोटीतून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे पर्यटक, वहातूकदार यांची सोय झाली आहे. अंतर कमी असल्याने इंधनाची बचत होते. गर्दीच्या हंगामात मात्र खूप वेळ जातो. सागरी महामार्गावर होणाऱ्या खाडीपुलांमुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे.वाहन चालकांना फेरी बोटीचा वेळ साधण्याची आवश्यकता पडणार नाही. Commencement of work on bay bridges on marine highway
तवसाळ जयगड पुलाचे काम सुरू
रत्नागिरी जिल्ह्यातील तवसाळ ते जयगड हा खाडीपूल 704 कोटी रुपयांचा आहे. या पुलाच्या बांधकामाची पूर्व तयारी ठेकेदाराने सुरु केली आहे. जमीनीत तसेच खाडीच्या तळाशी असलेल्या भूभागाच्या परिक्षणाचे काम सुरु झाले आहे. पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाला सुरवात होईल. त्यासाठी या ठेकेदाराने तवसाळमध्ये सुमारे 2 एकर जागेत कामगारांसाठी वसाहत, काँक्रीट प्लांट, पुलाचे गर्डर तयार करण्यासाठी रॅम्प, लोखंडी सळ्यांच्या जोडणीसाठी स्वतंत्र शेड अशा उभारणीला सुरवात केली आहे. Commencement of work on bay bridges on marine highway


किती लांबीचे आहेत पुल
बहुचर्चित सागरी महामार्गावरील सर्वात लांब पुल धरमतर खाडीवर बांधण्यात येत आहे. या पुलाची लांबी 10.2 कि.मी. इतकी आहे. अगारदांडा खाडी पूल 4.3 कि.मी., कुंडलिका खाडी पुल 3.8 कि.मी., जयगड खाडी पुल 4.4, काळबादेवी खाडी पुल 1.8 कि.मी., आणि कुणकेश्र्वर येथील समुद्रकिनाऱ्यावरुन जाणारा पुल 1.6 कि.मी, लांबीचा आहे. या सर्व पुलांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून ठेकेदारांनी कामाला सुरवात केली आहे. यापैकी काही पुल हे केबलच्या आधाराने उभारण्यात येणार आहेत. Commencement of work on bay bridges on marine highway
या महामार्गाच्या उपलब्धीविषयी बोलताना तवसाळचे ग्रामस्थ नीलेश सुर्वे म्हणाले की, भविष्यात कोकणात रिफायनरी, अणुवीज हे दोन मोठे प्रकल्प सुरू होणार आहेत. हे दोन्ही प्रकल्प सागरी महामार्गाच्या लगत आहेत. गुहागरमधील कोकण एलएनजी आणि रत्नागिरी गॅस हे दोन्ही प्रकल्पही सागरी महामार्गालगत आहेत. त्यामुळे हा महामार्ग पर्यटनाबरोबरच आर्थिक विकासालाही चालना देणारा आहे. पारंपरिक मुंबई गोवा महामार्गावरील वहातुक या महामार्गामुळे काहीप्रमाणात वळेल. त्यामुळे सागरी महामार्गावर हॉटेल, लॉज यासारखे नवे व्यवसायही उभे रहातील. त्यामुळे नवा मार्ग रोजगाराच्या नव्या संधी घेवून येणार आहे. त्याची झलक सध्या तवसाळमधील ग्रामस्थांना पहायला मिळत आहे. Commencement of work on bay bridges on marine highway