• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 August 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

by Guhagar News
April 22, 2025
in Maharashtra
83 1
0
Heat wave warning in the state
162
SHARES
464
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई, ता. 22 : अवकाळीचे ढग गेले पण उष्णता वाढली आहे. राज्यावर पुन्हा एक नवं संकट उभं राहिलं आहे. पुढचे तीन दिवस उष्णता प्रचंड वाढणार असून अंगाही लाहीलाही होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असा इशारा दिला आहे. Heat wave warning in the state

राज्यभर उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र झाला असून, नागरिक हैराण झाले आहेत. आज (२२ एप्रिल) विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये दमट हवामानामुळे अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असून, यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे नोंदवले गेले असून, ते तब्बल ४४.६ अंश सेल्सिअस इतके होते. अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा येथेही तापमान ४४ अंशांवर, तर यवतमाळ आणि सोलापूरमध्ये ४३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. Heat wave warning in the state

गडचिरोली, शिर्डी, परभणी, गोंदिया आणि जळगाव येथेही तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचले. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांमध्ये दमट हवामानामुळे नागरिकांना अस्वस्थतेचा सामना करावा लागू शकतो. या जिल्ह्यांमध्ये उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आहे. या  जिल्ह्यांमध्ये हिटवेवचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने नागरिकांना शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि अंग झाकणारे हलके कपडे वापरावेत, असा सल्ला दिला आहे. Heat wave warning in the state

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHeat wave warning in the stateLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share65SendTweet41
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.