मुंबई, ता. 22 : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाड्या ३० एप्रिलपर्यंत सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे. तर याचसोबत जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस या गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर पर्यंत धावणार आहेत. Konkan Railway will run till Thane

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. फलाट क्रमांक १० आणि ११ चे विस्तारीकरण झाले असून १२, १३ या फलाटांचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या फलाटावरून २४ डब्यांची रेल्वेगाडी धावू शकेल. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे या फलाटावर येणाऱ्या रेल्वेगाड्या इतर फलाटावर पाठवण्यात येत आहेत . तेजस, जनशताब्दी यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत धावत आहेत. मंगळुरू एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावते. परिणामी, प्रवाशांना ठाण्यावरून सीएसएमटी गाठण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासही सहन करावा लागत आहे. Konkan Railway will run till Thane