• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लोकशाही दिनात महामार्गाचा विषय चांगलाच तापला

by Ganesh Dhanawade
April 22, 2025
in Guhagar
536 5
0
Villagers angry about Guhagar-Bijapur road
1.1k
SHARES
3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राष्ट्रीय महामार्गच्या सक्षम अधिकाऱ्यांना दोन दिवसात जनतेसमोर बोलावणार; नायब तहसीलदार

गुहागर, ता. 22 : गुहागर – विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर शहर नाका ते  शासकीय विश्रामगृह या रहदारीच्या मुख्य मार्गावर पडलेले खड्डे आणि रखडलेल्या कामाबाबत येथील संतप्त ग्रामस्थांनी गुहागरच्या लोकशाही दिनात विचारणा केली. पावसाळ्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे सक्षम अधिकारी यांच्याशी बोलणे करून येत्या दोन दिवसात त्यांना जनतेसमोर बोलावण्यात येईल, असे आश्वासन नायब तहसीलदार श्रीम. मेहता यांनी उपस्थितीत ग्रामस्थांना दिले. Villagers angry about Guhagar-Bijapur road

Villagers angry about Guhagar-Bijapur road

या लोकशाही दिनात पराग कांबळे, विशवनाथ रहाटे, अनिल शिंदे, सतीश शेटे, सुमित आठवले, अभिजित मर्दा,  विकास जाधव, अमित जोशी, अरुण भुवड, सखाराम अवेरे आदींनी येत्या 30 एप्रिलच्या आत या मार्गावर पडलेले खड्डे बुजवून चांगले कार्पेट मारून जनतेला रस्ता उपलब्ध करून द्यावा. अन्यथा पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करावी लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. Villagers angry about Guhagar-Bijapur road

या रस्त्याबाबत गुहागर नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी यांनी ऑगस्ट 2024 ला राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्र देण्यात आले आहे. त्यानंतर आठवण म्हणून पुन्हा लेटर देखील देण्यात आल्याचे सांगितले. सदरचा रस्ता सद्या अपघातास कारणीभूत ठरत आहे. दुरावस्था झालेल्या मार्गाची त्वरित दुरुस्ती करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. Villagers angry about Guhagar-Bijapur road

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVillagers angry about Guhagar-Bijapur roadगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share421SendTweet263
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.