• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्यांचा अजब कारभार

by Mayuresh Patnakar
April 18, 2025
in Ratnagiri
88 1
0
Government Tantraniketan Principal of Ratnagiri's strange work
174
SHARES
496
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राष्ट्रगीत ऑप्शनला तर ठराविक समाजातील विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी विशेष जागा

रत्नागिरी, ता. 18 : येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात  काही वेळा राष्ट्रगीत ऑप्शनला टाकले जात असल्याचे तसेच ठराविक समाजातील विद्यार्थ्यांना शुक्रवारी प्रार्थनेसाठी विशेष जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आरोप करत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तंत्रनिकेतनच्या प्राचार्याना जाब विचारला. Government Tantraniketan Principal of Ratnagiri’s strange work

हा प्रकार सातत्याने शासकीय तंत्रनिकेतन अर्थात पॉलिटेक्निकमधे घडत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालय गाठले आणि प्राचार्यांची भेट घेऊन काही वीडियो दाखवले. वास्तविक राष्ट्रगीत नेहमी म्हणणे अपेक्षित असताना अनेकदा ते दैनंदिन कामकाजातून वगळले जात असल्याचे निदर्शनास आले तर काही ठराविक समाजातील विद्यार्थ्याना प्रार्थनेसाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याबद्दल जाब विचारला. तसेच  यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले की, या विद्यालयात गणवेश सक्तीच्या नियमांची अंमलबजावणी केवळ हिंदू विद्यार्थ्यांवर होत असून मुस्लिम विद्यार्थ्यांना कोणतेही बंधन नाही. अशा प्रकारची एकतर्फी वागणूक हिंदू विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. Government Tantraniketan Principal of Ratnagiri’s strange work

या मुद्द्यांवर प्राचार्यांना धारेवर धरत कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदवला. त्यानंतर प्राचार्यांनी दिलगिरी व्यक्त करत, “आता पुढे असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत. सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली जाईल. कोणतेही अनुचित प्रकार त्वरित थांबवले जातील,” अशी ग्वाही दिली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. Government Tantraniketan Principal of Ratnagiri’s strange work

Tags: Government Tantraniketan Principal of Ratnagiri's strange workGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.