• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महिला सुरक्षेसाठी बसमध्ये ‘पॅनिक बटण’

by Guhagar News
April 16, 2025
in Maharashtra
203 2
0
Panic button in bus for women safety
398
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई, ता. 16 : गेल्या काही कालावधीपासून महिलांच्या एसटी प्रवासातील सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये ‘पॅनिक बटण’ लावण्यात येणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर व नवीन येणाऱ्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.  यासह एसटी बस स्थानकांचे आधुनिकरण करून, प्रवाशांना दर्जेदार सुविधा प्रदान करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. Panic button in bus for women safety

राज्यातील एसटी बस स्थानके अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यात येणार असून ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ किंवा खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बस स्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालये संबंधित विकासकाकडून बांधून घेणे. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची राज्यभरात ८४२ ठिकाणी १,३६० हेक्टर जमीन आहे. त्याचे शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे. Panic button in bus for women safety

पहिल्या टप्प्यातील ६६ जागांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यात संबंधित विकासकाने एसटीच्या जिल्हा स्तरांवरील जागेसह तालुका स्तरावरील जागा व ग्रामीण भागातील जागा अशा तीन जागा विकसित करावयाची आहेत. त्यामुळे एसटीच्या अविकसित जागाही चांगल्या विकासकाकडून विकसित होतील. राज्यातील १३ कोटी जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. भविष्यात एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार दळणवळण सेवा देण्यासाठी काही चांगले निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्व बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही अत्याधुनिक पद्धतीची स्वच्छ व निर्जंतुक असतील. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ केली जाईल, सरनाईक यांनी सांगितले. Panic button in bus for women safety

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarPanic button in bus for women safetyUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share159SendTweet100
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.