गुहागर ता. 11 : भारतीय रेल्वे ही आशियातील दुसरी आणि जगातील चौथ्या क्रमांकाच सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. भारतातील कोट्यवधी जनता रेल्वेने प्रवास करते. भारतीय रेल्वेतील कोच वेगवेगळ्या रंगाचे असतात. सर्वाधिक ट्रेनमध्ये निळ्या रंगाचे कोच असतात. मात्र लाल आणि हिरव्या रंगांच्या कोचचा देखील समावेश असतो. यामागचं सर्वसाधारण कारण काय आहे हे जाणून घेऊया. Train Colour codes
निळ्या रंगाचे कोच
सर्वाधिक ट्रेनमध्ये निळ्या रंगाचे कोच असतात. या कोचला ICF म्हणतात म्हणजे इंटीग्रल कोच फॅक्टरी म्हणतात. याचा कारखाना तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये आहे. निळ्या रंगाचे कोच हे एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट ट्रेनमध्ये असतात. या कोचला एअर ब्रेक असतात. तसेच हे कोच लोह असून 110 किमी ताशी वेगासाठी बनलेले असतात. Train Colour codes


लाल रंगाचे कोच
लाल रंगाच्या कोचला LHB म्हणजे Linke Hofmann Busch म्हटले जाते. हा कोच 2000 मध्ये जर्मनीमधून भारतात आणले गेले आहेत. या कोचला बनवण्याची फॅक्टरी ही पंजाबच्या कपूरथलामध्ये आहे. लाल रंगाचे डबे स्टेनलेस स्टीलचे बनलेले असतात जे निळ्या रंगाच्या डब्यांपेक्षा हलके असतात. या कोचचा कमाल वेग ताशी 200 किलोमीटरपर्यंत आहे. हे शताब्दी किंवा राजधानी सारख्या ट्रेनमध्ये वापरले जातात. Train Colour codes
हिरव्या रंगाचे कोच
लाल आणि निळ्या डब्यांव्यतिरिक्त, तुम्ही काही गाड्यांमध्ये हिरवे डबे देखील पाहिले असतील. गरीब रथ सारख्या गाड्यांमध्ये हिरव्या रंगाचे डबे वापरले जातात. Train Colour codes