• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आज कोतळूक येथे कबड्डी स्पर्धा

by Manoj Bavdhankar
March 27, 2025
in Guhagar
119 1
0
Kabaddi tournament at Kotluk today
234
SHARES
669
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या वाढदिवस व ग्रामदेवता पालख्यांचे सहाणेवर आगमनानिमित्त आयोजन

गुहागर, ता. 27 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य, तवसाळ गावचे सुपुत्र मा. श्री निलेशजी सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कोतळूक ग्रामदेवता पालख्यांचे सहाणेवर आगमन याचे औचित्य साधून तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धा राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने  ग्रामदेवता सहाणेसमोर आज गुरूवार दि. 27 व बुधवार 28 मार्च 2025 या दोन दिवस सायंकाळी ६ वा. पासून सुरु करण्यात येणार आहेत. Kabaddi tournament at Kotluk today

गुहागर तालुका कबड्डी असोसिएशन मान्यतेने संलग्न असलेल्या ८ संघांमध्ये साखळी पद्धतीने या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रक्कम 10 हजार 1 व  चषक, द्वितीय क्रमांकास रोख रक्कम 5 हजार 1 व चषक, तृतीय व चतुर्थ विजेत्या संघांना चषक देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, पकड अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेदरम्यान भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचा वाढदिवस 27 मार्च रोजी रात्री 10 वा. साजरा करण्यात येणार आहे.  तरी सर्व क्रिडा प्रेमी हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी वतीने करण्यात आले आहे. Kabaddi tournament at Kotluk today

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKabaddi tournament at Kotluk todayLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.