• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गवा प्राण्यामुळे बागायतींच्या नुकसानीत वाढ

by Ganesh Dhanawade
March 25, 2025
in Guhagar
116 1
0
Horticultural damage caused by animals
228
SHARES
650
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उपाययोजना करण्याबाबत डाँ. नातू यांचे मुख्य वनसंरक्षकांना पत्र

गुहागर, ता. 25 : गुहागर व चिपळूण तालुक्यातील वन्य प्राण्यांकडून होत असणाऱ्या नुकसानीमध्ये गवा प्राण्याने केलेल्या नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. याकरिता शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याकरिता काही आराखडा तयार करून वन विभागामार्फत सदर आराखड्याची अंमलबजावणी करावी व शेतकऱ्यांना त्यांच्या बागायतीला होणाऱ्या त्रासापासून संरक्षण मिळणेबाबत योग्य ती उपाययोजना आपल्या स्तरावर करावी, अशी मागणी  माजी आ. डाँ. विनय नातू यांनी नागपूर येथील वन्यजीव मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. Horticultural damage caused by animals

या पत्रात म्हटले आहे की, गुहागर तालुक्यातील झोंबडी गावामध्ये गट नंबर १८४४, १८४६, १८४८ मध्ये आंबा व काजूची बाग आहे. या आंबा कलमांच्या बागेमध्ये गवा प्राणी शिरून आंब्याची कच्ची फळे खाणे, आंबा झाडाला घासून आंबे पाडून आंबा बागेची नुकसान करीत आहेत. या भागातील गवा प्राणी कळपाने सुपारी, काजू, आंबा या सर्व बागायती क्षेत्रांमध्ये येत असून, बागायती क्षेत्रातील झाडांची मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. या सर्व नुकसानीचे प्रमाण फार मोठे आहे. बागायतीचे होणारे नुकसान आर्थिक मदतीने न भरून येणारे आहे. कारण, बागायत क्षेत्र निर्माण करण्याकरिता  शेतकऱ्याला अनेक वर्ष कष्ट करावे लागतात. दिवसेंदिवस गवा प्राण्याचा त्रास गुहागर व चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढत आहे.  यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात, असे पत्रात नमूद केले आहे. Horticultural damage caused by animals

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHorticultural damage caused by animalsLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share91SendTweet57
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.