• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 August 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण वाशिष्ठी नदीत मुलाचा बुडून मृत्यू

by Guhagar News
March 20, 2025
in Ratnagiri
146 1
1
Child drowned in Chiplun Vashishthi river
286
SHARES
818
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा मन्सूर घारे (वय-१५, गोवळकोट मोहल्ला, चिपळूण) असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. Child drowned in Chiplun Vashishthi river

तलहा घारे व अन्य तिघेजण काल बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास गोवळकोट येथील वाशिष्ठी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. यामध्ये तलहाचा छोटा भाऊही होता. मात्र त्याचवेळी वाशिष्ठी नदीला भरतीचे मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. नदीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तलहा घारे पाण्यात बुडाला व काही क्षणात दिसेनासा झाला. यावेळी तिघांनी आरडाओरड केली. आरडाओरडा होताच घटनास्थळी अनेकांनी धाव घेतली. तलहा घारे याचा स्थानिक बोटचालकांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो अर्ध्या तासाने तो मृतावस्थेत सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. Child drowned in Chiplun Vashishthi river

Tags: Child drowned in Chiplun Vashishthi riverGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet72
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.