• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मतदार ओळखपत्र आधारकार्डसोबत लिंक होणार

by Guhagar News
March 19, 2025
in Maharashtra
87 1
0
Voter ID will be linked to Aadhar card
171
SHARES
489
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

नवीदिल्ली, ता. 19 : मतदान ओळखपत्राला आधारकार्डसोबत लिंक करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून लवकरच यासंदर्भात तज्ज्ञ लोकांशी चर्चा करुन अंमलबजावणी केली जाणार आहे. Voter ID will be linked to Aadhar card

या निर्णयानुसार आता प्रत्येक व्यक्तीला आपलं मतदान ओळखपत्र हे आधारकार्डशी लिंक करणं बंधनकारक असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सदनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासोबत डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहसचिव होते. त्याबरोबच विधिमंडळाचे सचिव होते. या बैठकीत अनेक तज्ज्ञही उपस्थित होते. या बैठकीत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, आधारकार्डसोबत मतदाता नोंदणी क्रमांक म्हणजेच जो नंबर ईपीआयसीला लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Voter ID will be linked to Aadhar card

काही दिवसांपूर्वीच तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी ईपीआयसी क्रमांकावर आक्षेप घेतला होता. बंगालसह काही राज्यांमध्ये ईपीआयसी क्रमांक समान असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला होता. त्यानंतर  पॅनकार्डप्रमाणेच आता मतदान ओळखपत्रही आधार कार्डाशी जोडण्याची प्रक्रिया वेग धरू लागली होती. आज निवडणूक आयोगाने महत्त्वाची बैठक बोलावली, ज्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, लोकसभा तसेच विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. बोगस मतदार रोखण्यासाठी आणि बनावट मतदार ओळखण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे निवडणुकांमध्ये पारदर्शकता येईल, असा निवडणूक आयोगाचा विचार आहे. Voter ID will be linked to Aadhar card

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarVoter ID will be linked to Aadhar cardगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share68SendTweet43
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.