रस्त्यासाठीचा मंजूर निधी दुसऱ्या कामावर खर्च करण्याचा प्रयत्न
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील ग्रामीण मार्ग 54 पांगारी तर्फे हवेली सडेवाडी भुरकुंडा या रस्त्यावर दगडी बांध घालून तो अडविण्यात आला आहे. या रस्त्यासाठी २०२४-२०२५ या कालावधीत जिल्हा नियोजन अंतर्गत १० लाख निधी मंजूर असून त्या कामाला सरपंच पांगारी तर्फे हवेली वेळोवेळी विरोध करून ती निधी दुसऱ्या ठिकाणी खर्ची करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याविरोधात येथील ग्रामस्थांनी गुहागर पंचायत समिती गटविकास अधिकारी, तहसिलदार, पोलीस ठाणे यांना तक्रारींचे निवेदन दिले आहे. Villagers complain about blocking Bhurkunda road
पांगारी तर्फे हवेली सडेवाडी भुरकुंडा हा ग्रामीण मार्ग ५५ किमान गर्ज ह्या निधीतून सन २००९ ते २०१० मध्ये जमीन मालकांच्या रु. १००/- मुद्रांकवर सहमती घेऊन करण्यात आला. त्यावेळी सरपंच सरिता गिजे व अतिक्रमण करणारे अ. गफार शरफुद्दीन दळवी यांचे भाऊ श्री. इकबाल शर्युद्दिन दळवी (मयत) ह्यांचे मोठे भाऊ उपसरपंच होते. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या प्रस्थापन अल्पसंख्य निधीतून ५ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्या वेळी अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीचे लहान भाऊ नुर महमद शरफुद्दीन दळवी हे सरपंच होते. आता त्या रस्त्यावर २०२४-२०२५ कालावधीत जिल्हा नियोजन अंतर्गत १० लाख निधी मंजूर असून त्या कामाला सरपंच वेळोवेळी विरोध करून ती निधी दुसऱ्या ठिकाणी खर्ची करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. Villagers complain about blocking Bhurkunda road


या रस्त्यासाठी भाजपचे केदार साठे व जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर झाला. आता ग्रा.पं.वर सरपंच हा उध्दव ठाकरे या गटाचा असून तो हे काम करून देण्याची त्यांची मानसिकता नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्या कामाची वर्क ऑर्डर ३१ मार्च २०२५ ला संपत आहे. त्या करिता वेळ काढून पणा निधी परत जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी तत्काळ अतिक्रमण करणाऱ्यावर चौकशी करून कारवाही करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. Villagers complain about blocking Bhurkunda road