गुहागर, ता. 08 : पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, अमैरा ही चिमुरडी आपली आई व आणखी एका लहान बहिणीसमवेत गोव्याला तिच्या आजीकडे राहत होती. काही वैयक्तिक कारणास्तव ही महिला आपल्या दोन्ही मुलींना घेऊन रत्नागिरीतून गोव्याला उसगाव येथे रहायला गेली होती. अमैराचे वडील मात्र रत्नागिरीत राहतात.दोन दिवसांपूर्वीच ते गोव्याला येऊन गेले होते. कसलये तिस्क या परिसरात हे सर्वजण राहत होते. कसलये तिस्क हा परिसर फोंड्यातील झोपडपट्टी सदृश्य भाग म्हणून परिचित आहे. या परिसरात बिगर गोमंतिकांचा भरणा आहे. याच परिसरात एका घराजवळ गुरूवारी काही जणांना एक मृतदेह पुरलेला आढळला. हा मृतदेह एका 4 ते 5 वर्षांच्या बालिकेचा असल्याचे दिसताच हा काहीतरी जादूटोण्याचा प्रकार असावा असा संशय त्यांना आल्याने पोलीसांना खबर देण्यात आली. उसगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चौकशी सुरू झाली. आरोपी पप्पू अलहड (वय 52) आणि पूजा अलहड (वय 40) अशी या नवरा बायकोची नावे असल्याचे पोलीसांनी माहिती देताना सांगितले. Killing a girl to get a child
तपास करताना याच परिसरात राहणारी मुलगी बुधवारपासून बेपत्ता असल्याचे पुढे आले. तिचा शोध सुरू होता. विशेष म्हणजे जिथे हा मृतदेह पुरलेला आढळला, त्या घरापासून 50 मीटर अंतरावर अमैरा आपल्या आई आणि बहिणीसोबत राहत होती. पोलीसांनी तिच्या आईला घटनास्थळी बोलावले. तिने मृतदेह पाहताच ओळखला आणि अक्षरशः हंबरडा फोडला. पुढील शोधकार्य हे एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कहाणी आहे. पूजा आणि पप्पू अलहड या निपुत्रिक दांपत्याने अमैरा हिला शोधले. आपल्या नरबळीसाठी ती योग्य असल्याचे कळताच तिला नकळत पळवले. नरबळी दिला आणि मृतदेह पुरला. त्यानंतर जणू काहीच झाले नाही अशा आविर्भावात हे दोघेही वावरत होते. धक्कादायक म्हणजे पूजा आणि पप्पू हे दोघंही ज्याठिकाणी मृतदेह सापडला त्याठिकाणी अन्य लोकांसमवेत आले आणि आपला काही संबंध नाही, असे भासवत त्या कुटुंबियांचे सांत्वनदेखील करत होते. Killing a girl to get a child
दरम्यान असे असले तरी या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याने त्यांचा घात केला. त्याच्यात हत्या करताना ते कैद झाले होते. या सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करत उसगाव पोलीसांनी सुतावरून स्वर्ग गाठत आरोपींना पकडले. पोलीसांच्या चाणाक्ष नजरेतून पूजा आणि पप्पू सुटले नाहीत. त्यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि पोलीसांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांची ततपप…. उडाली. त्यांनी खाक्या दाखवत अधिक चौकशी केली असता हे कृत्य आपणच केल्याची माहिती या दांपत्याने चौकशीत दिल्याचे पोलीसांनी पत्रकारांना सांगितले. Killing a girl to get a child
ज्यावेळी अमैराला या दांपत्याने पळवले त्यावेळी तिची आई तिच्या छोट्या बहिणीला घेऊन एका रूग्णालयात आपल्या नातेवाईकांची चौकशी करण्यासाठी गेली होती. अमैरा घरी मोबाईलवर खेळत होती. आजी कामात मग्न होती. हाच डाव साधत पूजाने अमैराला उचचले आणि पळविले. पप्पूदेखील त्याच परिसरात होता. नरबळी देऊन झाल्यानंतर पूजा आणि पप्पू मिरजला पळून जाणार होते. मात्र त्याआधीच पोलीसांनी त्यांना पकडले आणि अंधश्रध्देचा बाजार उघड झाला. Killing a girl to get a child
पप्पू ऊर्फ बाबासाहेब हा एक उत्कृष्ट वेल्डर आहे. हे कुटुंबिय मुळचे मिरज येथील आहे. गोव्यात ते कामधंद्यानिमित्त आले. कसलये येथे राहण्यापूर्वी तो धारबांदोडा संजीवनी साखर कारखान्याजवळ राहत होता. लग्नाला 20 वर्षे उलटली तरी त्याच्या घरात पाळणा हलला नव्हता. त्यामुळे त्याने आपल्याला जादूटोण्याने मूल व्हावे व घरात समृद्धी यावी यासाठी हे अघोरी कृत्य केले असावे असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस त्या दृष्टीने चौकशी करत आहेत. अमैराला पाण्यात बुडवून मारल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. खरेतर बुधवारीच पप्पूने आपल्या पत्नीच्या सहकार्याने अमैरा हिला ठार मारून तिचा मृतदेह घरातच ठेवला होता. मात्र पोलिस चौकशीला आल्यानंतर रात्रीच खड्डा खणून त्यात तो मृतदेह पुरला. शुक्रवारी सकाळी पोलिस चौकशीत त्याने ही कबुली दिली आणि अमैराच्या गायब होण्याच्या प्रकाराचा उलगडा झाला. Killing a girl to get a child