गुहागर, ता. 08 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची सांस्कृतिक कार्यक्रम दि. १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता भवानी सभागृह मंगल कार्यालय, पालपेणे रोड, शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आला आहे. Ahilyadevi Holkar Jayanti at Shringartali


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाने सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे. Ahilyadevi Holkar Jayanti at Shringartali


या कार्यक्रमात ख्यातनाम कलावंत सहभाग घेणार आहेत. दर्जेदार कलाकारांच्या कला सादरीकरणातून ज्येष्ठ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात येईल. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी व नागरीकांनी या सांगितिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक श्री विभीषण चवरे यांनी केले आहे. Ahilyadevi Holkar Jayanti at Shringartali