गुहागर, ता. 04 : ज्ञानरश्मि वाचनालय येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी श्री राजेंद्र आरेकर होते. Marathi Language Day at Gyanrashmi Library


यावेळी प्रमुख पाहुणे श्री प्रशांत साटले, वाचनालयाचे कार्याध्यक्ष श्री दत्तात्रय पर्शुराम गुरव गुरुजी, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सुधाकर कांबळे सर, श्री प्रभुनाथ देवळेकर, सौ अरुणा पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, लेखक, नाटककार कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. प्रा. सौ मनाली बावधनकर यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. तसेच कवी विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज हे नाव कसे पडले या विषयी थोडक्यात माहिती दिली. श्री दत्तात्रय गुरव गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. श्रीमती वंदना माने यांनी कुसुमाग्रजांची कविता सादर केली. अध्यक्षीय भाषणात श्री राजेंद्र आरेकर यांनी वाचनाचे महत्त्व पटवून दिले. Marathi Language Day at Gyanrashmi Library


यावेळी आयोजित रंगभरण स्पर्धेमध्ये छोटा गट – प्रथम क्रमांक स्वरा वायंगणकर, व्दितीय अनुज बामणे, तृतीय जिया जोशी. इयत्ता पहिली ते चौथी प्रथम क्रमांक आयुष जोशी, व्दितीय रुंजी जोशी, तृतीय सर्वेश जोशी. इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक अपेक्षा मुरकुटे, व्दितीय वल्लभ सरकार, तृतीय गोजिरी मुळे.
निबंध स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी प्रथम क्रमांक सानवी खातू, उत्तेजनार्थ अर्णव तोडणकर, इयत्ता सहावी प्रथम क्रमांक दुर्वा नाटेकर, उत्तेजनार्थ ईशा केदार परचुरे इयत्ता सातवी प्रथम क्रमांक शर्वरी कदम उत्तेजनार्थ जान्हवी फटकरे या सर्व विद्यार्थ्यांना वाचनालयात सन्मानचिन्ह व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. Marathi Language Day at Gyanrashmi Library


या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनाली बावधनकर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री सुधाकर कांबळे सर यांनी केले तर आभार ग्रंथपाल सौ गौरी घाडे यांनी मानले. यावेळी श्री शैलेंद्र खातू, श्रीम. वंदना माने, असगोलकर मॅडम, सौ प्रेरणा लोंढे, सौ सोनाक्षी साटले, सौ बावधनकर, शामली घाडे, सानिका जांगळी, विद्यार्थ्यी, पालक, उपस्थित होते. Marathi Language Day at Gyanrashmi Library