• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत स्वच्छता अभियान

by Guhagar News
February 28, 2025
in Guhagar
181 2
0
Cleanliness campaign through Nanasaheb Dharmadhikari Foundation
355
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 28 : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त गुहागर शहर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. Cleanliness campaign through Nanasaheb Dharmadhikari Foundation

यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन, विहिरी नद्या साफसफाई, जल पुनर्भरण, पाणपोई, बंधारा उपक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. या प्रतिष्ठानच्या सौजन्याने रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता गुहागर शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले ‘स्वच्छता दूत’ डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. Cleanliness campaign through Nanasaheb Dharmadhikari Foundation

या शहर स्वच्छता अभियानामध्ये गुहागर शहरासोबत महाराष्ट्रातील तसेच देशात व परदेशात देखील विविध शहरांमध्ये हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.  श्री बैठक मधील हजारोच्या संख्येने सर्व श्री सदस्य सहभागी होणार आहेत. तरी या स्वच्छता अभियानामध्ये प्रतिष्ठानच्या वतीने आपणा सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की,  आपणही दिनांक 2 मार्च 2025 रोजी होणाऱ्या शहर स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे. या स्वच्छता अभियानामध्ये शहरातील सर्व प्रमुख रस्ते व शासकीय कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. तसेच या अभियानामध्ये सर्व शासकीय कर्मचारी यांनी देखील सहभागी व्हावे, असे प्रतिष्ठानच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे. Cleanliness campaign through Nanasaheb Dharmadhikari Foundation

Tags: Cleanliness campaign through Nanasaheb Dharmadhikari FoundationGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share142SendTweet89
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.