वेंकटेश अय्यर व रिंकू सिंग यांनी व्यक्त केला विश्वास
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 26 : गोविंदराव निकम क्रीडा नगरीमधील सीझन बॉल (टर्फ विकेट) क्रिकेट मैदानातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यर व रिंकू सिंग यांनी व्यक्त केला. आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने खरवते दहिवली येथे सह्याद्रि शिक्षण संस्थेतर्फे सीझन बॉल टर्फ विकेट क्रिकेट मैदानाचे नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित, प्रशिक्षक दिनेश लाड, सचिन कोळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. Inauguration of Season Ball Cricket Ground


यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वेंकटेश अय्यर व रिंकू सिंग यांनी या मैदानातील सोयी सुविधा व उभारणी पाहून समाधान व्यक्त केले. तर या मैदानात रणजी स्पर्धा देखील होऊ शकते व नव खेळाडुंसाठी हे मैदान एक उत्तम व्यासपीठ ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तर भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक व कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी आपल्या मनोगतात आमदार शेखर निकम यांनी घेतलेल्या पुढाकाराचे व संकल्पनेचे कौतुक करीत गोविंदराव निकम क्रीडा नगरीच्या सिझन बॉल टर्फ क्रिकेट मैदानात स्थानिक क्रिकेटपटूंना चांगले मैदान मिळाले आहे व या मैदानातून रणजी व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडतील, असा विश्वास व्यक्त केला. Inauguration of Season Ball Cricket Ground




आमदार शेखर निकम यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक चंद्रकांत पंडित, प्रशिक्षक दिनेश लाड, सचिन कोळी आदींचे स्वागत करीत या भव्य मैदानाच्या उभारणीचे उद्दिष्ट स्पष्ट केले. महाविद्यालय प्रक्षेत्र भेटीदरम्यान रिंकु सिंग व व्यंकटेश अय्यर यांनी विद्यार्थ्यांच्या विविध संशोधनात्मक प्रकल्पांना भेटी देवुन सविस्तर माहिती घेतली व विद्यार्थ्यांकडून बनवण्यात आलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. Inauguration of Season Ball Cricket Ground


यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडीक, शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील, चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पूजा निकम, अनिरुद्ध निकम, सावर्डेच्या सरपंच सौ. समीक्षा बागवे, सुभाष मोहिरे, उपसरपंच जमीर मुल्लाजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, दशरथ दाभोळकर, सचिन पाकळे, केतन पवार, विपुल घाग, अमित सुर्वे, मजीद मुल्लाजी, सतीश सावर्डेकर, अशोक काजरोळकर, विकास घाग, मयूर खेतले महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारीवर्ग व विद्यार्थ्यी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डा.हरिश्चंद्र भागडे व तुषार बिजीतकर यांनी केले. Inauguration of Season Ball Cricket Ground