संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थान मासू येथे सालाबादप्रमाणे बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी “महाशिवरात्री उत्सव २०२५” या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांनी हा उत्सव साजरा करण्यात येणार असून रात्रौ ठिक १० वाजता रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात नावाजलेली नाट्यकृती “रंग भरु दे आमच्या गणा..! हे नाटक सादर होणार आहे. तरी मासू पंचक्रोशीतील जनतेने या संपूर्ण उत्सवाचा, कार्यक्रमांचा आणि स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थानाचा दर्शनाचा लाभ घ्यावा, असे जाहिर आवाहन देवस्थान कमिटी, मासू गाव आणि मुंबई, ग्रामस्थ यांचे वतीने करण्यात आले आहे. Mahashivratri festival at Masu


“महाशिवरात्री उत्सव २०२५’ निमित्ताने बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १0 वाजता नित्यपूजा, सकाळी ०८ ते ०९ वाजता षोडशोपचारे, सकाळी ०९ ते १०:३० अभिषेक, सकाळी ११ वाजता श्री. सत्यनारायणाची महापूजा, दुपारी ०१ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, दुपारी ०२ ते ०४ या वेळेत सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ०७ वाजता सत्कार समारंभ, रात्रौ ०८:३० वाजता स्थानिक ग्रामस्थांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम, रात्रौ ठिक १० वाजता रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात नावाजलेली नाट्यकृती रंग भरु दे आमच्या गणा..! हि विनोदी नाट्यकृती, नाटक सादर होणार आहे. Mahashivratri festival at Masu


तरी मासू पंचक्रोशीतील जनतेने देवदर्शनाचा आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे जाहीर आवाहन स्वयंभू श्री. सोमेश्वर देवस्थान कमिटी मासू गाव आणि मुंबई, ग्रामस्थ यांचे वतीने करण्यात आले आहे. Mahashivratri festival at Masu