आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेत (B. Arch) नील पाटणे 100 पर्सेनटाईल गुण मिळवत देशात प्रथम
गुहागर, ता. 24 : दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या बॅचलर ऑफ आर्किटेक्चर ( B. Arch ) प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडचा कु. नील संदेश पाटणे याने 100 पर्सेनटाईल गुण प्राप्त करून देशात प्रथम येण्याचा नवा विक्रम रचला आहे. त्याच्या या दमदार कामगिरीबद्दल रोटरी शाळेबरोबरच, खेड व महाराष्ट्र राज्याचे नाव देशपातळीवर उंचावले आहे. Rotary School student Neil Patne first in the country
B. Arch या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्सेसकरिता दरवर्षी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी प्रविष्ठ होत असतात. या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही रोटरी स्कूलचे विद्यार्थी देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून उज्ज्वल यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आपले स्थान निश्चित करून भारतातील नामांकित महाविद्यालयातील प्रवेशास पात्र ठरले आहेत. Rotary School student Neil Patne first in the country


या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु. नील पाटणे ( 100 पर्सेनटाईल व देशात प्रथम ) कु. पूर्वा साळवी (99.86 पर्सेनटाईल व कोकण विभागात द्वितीय), कु. यश राऊल (99.84 पर्सेनटाईल व कोकण विभागात तृतीय), कु. आऐशा तिसेकर (99.42 पर्सेनटाईल), कु. अभिषेक चव्हाण (99.26 पर्सेनटाईल), कु. आरुषी साबडे (99 पर्सेनटाईल ), कु. मनाल तिसेकर (98.88 पर्सेनटाईल), कु. सावरी जोशी (96.86 पर्सेनटाईल), कु. केतकी शिर्के (96.26 पर्सेनटाईल), कु. जय पवार (95.12 पर्सेनटाईल), कु. श्रेयस जाधव (94.54 पर्सेनटाईल), कु. श्रवण कदम (93.52 पर्सेनटाईल), कु. सावरी बुटाला (90.85पर्सेनटाईल), कु. साहिल पालवे (90.18 पर्सेनटाईल) यांचा समावेश असून यामध्ये तब्बल सहा विद्यार्थ्यांनी 99 पर्सेनटाईलपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. हे सर्व यशस्वी विद्यार्थी आर्किटेक्चर कोर्सेसाठी एस. पी. ए. भोपाळ, एस. पी. ए. दिल्ली, N.I.T.S यांसारख्या भारतातील पहिल्या दहा नामवंत कॉलेजच्या प्रवेशास पात्र ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. Rotary School student Neil Patne first in the country


B.Arch या प्रवेश परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रा. रोहन खेडेकर, प्रा. शुभम जड्याळ, प्रा. मानसी संतोष देवघरकर व श्री. गुरूप्रसाद देवघरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. Rotary School student Neil Patne first in the country