पुनर्विक्री शक्य असल्याने नवा दागिना घेता येणार
Guhagar News : सोन्याचे दागिने घेण्यासाठी भरपुर पैसे खर्च करावे लागतात. असा दागिना सहज विकणे मनाला पटत नाही. फॅशनच्या वेगाने बदलणाऱ्या रितीमध्ये जूना दागिना घालणेही रुचत नाही. या भावनिक खेळाला वामन हरी सराफने उत्तर शोधलयं. Electroforming Gold Jewellery चे नवे तंत्रज्ञान वापरुन 1 ग्रॅम पेक्षा कमी सोन्यात, नव्या फॅशनचे, स्वस्त दरातील दागिने वामन हरी पेठे सराफने आता बाजारात आणले आहेत. गुहागरवासीयांसाठी हे दागिने पहाण्याची आणि खरेदी करण्याची संधी 7 मार्च ते 9 मार्च या कालावधीत मिळणार आहे. Exhibition of Electroforming Gold Jewellery
वामन हरी पेठे सराफ या पेढीतर्फे 7, 8, 9 मार्च रोजी सकाळी 11 ते रात्री 8 या कालावधीत गुहागरमधील व्याडेश्र्वर देवस्थानच्या परशुराम सभागृहात 1 ग्रॅम सोन्याचे (फॉर्मिग) दागिन्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये बांगड्या, पाटल्या, अनारकली तोडे, इयर रिंग्ज्, पिचोडी, गजरा ठुशी, गंठण, बोर माळ, राणीहार, मोहन माळ, बकुळ हार, पोहे हार असे विविध प्रकारचे दागिने पहाण्याबरोबरच विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Exhibition of Electroforming Gold Jewellery
या नवीन प्रकारच्या दागिन्यांबद्दल, त्यांतील नवीन तंत्रज्ञानाच्या फायद्याबद्दल बोलताना सौ. तनया पेठे यांनी गुहागर न्यूजला माहिती दिली. त्या म्हणाल्या की, दागिन्यांमध्ये रोज नविन प्रकार व नविन फॅशन येत असते. आर्ट ज्वेलरी, कॉसच्युम ज्वेलरी, इमीटेशन ज्वेलरीमध्ये तयार केले जाणारे दागिने स्वस्त आणि आकर्षक असतात. परंतू त्यांत तांबे, अॅल्यूमीनीयम, फ्लास्टिक, काच वगैरे सर्वांचा वापर केला जातो. त्यामुळे या दागिन्यांची लकाकी थोड्याच दिवसांत निघून जाते. दोन चार वेळा वापरले की दागिने जूने होतात किंवा मोडतात. तसेच ह्या सर्व प्रकारांनी सोन्याचे दागिने घालण्याची हौस पूर्ण होत नाही. महागातील, 22 कॅरेट, 23 कॅरेट सोन्यात असे दागिने बनविले तर फॅशन फॅशन बदलली म्हणून परत परत मोडून नविन करणे शक्य होत नाही. त्यामुळे मन खट्टु होते. त्यावर वामन हरी पेठे सराफ या पेढीने 1 ग्रॅमचे (फॉर्मिंग) सोन्याचे दागिने नव तंत्रज्ञान वापरुन बाजारपेठेत आणले आहेत.
Electroforming Gold Jewellery
नेहमीचे सोन्याचे, दागिने 22 किंवा 23 कॅरेट सोन्याचे बनवतात. हे असे तंत्रज्ञान आहे की त्यात 24 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. इलेक्ट्रोफॉर्मिंग तंत्रज्ञानात विजेच्या साहाय्याने तांबे अगर चांदीच्या दागिन्यांवर खऱ्या सोन्याचा पातळ थर दिला जातो. हे सोने 24 कॅरेटचे असल्यामुळे दागिने नेहमीच्या दागिन्यांपेक्षा आकर्षक व देखणे असतात. ह्या दागिन्यांवरील तास काम, चकाकी नेहमीच्या दागिन्यांनपेक्षा जास्त चांगली असते. Exhibition of Electroforming Gold Jewellery
नवतंत्रज्ञात कोणते दागिने बनवले जातात
सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच नवीन तंत्रज्ञानातून गोठ, पाटल्या, बांगड्या, तोडे, ब्रेसलेट, चेन, हार, मंगळसूत्र, बाजूबंद, बंगाली, राजस्थानी नेकलेस, लफ्फा वगैरे सर्व प्रकार बनवता येतात. शिवाय मीना, ऱहोडीयम फीनीश, अमेरीकन डायमंड असे भरपूर प्रकारचे दागिनेही तयार करता येतात. आहेत. थोडक्यात सोन्यामधील सर्व प्रकारचे दागिने 1 ग्रॅम दागिन्यांमध्येही आहेत. आमच्या पेढीवर सर्व प्रकारचे दागिने सर्व साईजमध्ये हजर स्टॉक मध्ये आहेत.
मुल्य किती असते
1 ग्रॅमचे सर्व दागिने 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. दागिन्याचे वजन आणि आकारमानाप्रमाणे ही किंमत बदलती असते. परंतु सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत हे दागिने कितीतरीपट स्वस्त असतात. मघाशी म्हटल्याप्रमाणे हे दागिने सोन्यांच्या दागिन्यांपेक्षा अधिक आकर्षक असतात. त्यामुळे सोन्याचे दागिने घालण्याची हौस या दागिन्यांतही करता येते. महिला प्रवासात, बाहेरगांवी, गर्दीच्या ठिकाणी लोकलमधून प्रवास करताना, नोकरीवर जाताना हे दागिने वापरु शकतात. मुलांना शाळा, कॉलेज मध्येही हे दागिने सहज वापरता येतात. इतकेच काय स्वस्त दरातील सोन्याचे दागिने आपण आहेर किंवा भेट देण्यासाठीही सहज खरेदी करु शकतो. Exhibition of Electroforming Gold Jewellery
नवतंत्रज्ञानाचा फायदा
हल्ली 25/50 ग्रॅमचे सोन्याचे दागिने घरात ठेवणे सुध्दा जोखमीचे झाले आहे. 25 हजार, 50 हजार रुपयांचा दागिना घेताना आपण हौशीबरोबर गुंतवणूक असा विचार करुन विकत घेतो. त्यामध्ये 2 ते 5 हजार रुपये मजूरी असते. असा दागिना 10 ते 20 वर्षे वापरला जातो. पुन्हा नवा दागिना घेण्यासाठी हा दागिना मोडताना त्यावर तूट आकारली जाते. याउलट नवीन तंत्रज्ञानातील 1ग्रॅमचे दागिने तेवढयाच किंमतीत निरनिराळ्या डिझाईनचे 24 कॅरेट सोन्यातील दागिने आपण खरेदी करु शकतो.
नवे दागिने कसे वापराल
हे दागिने रोज वापरल्यास साबू, घाम, पाणी वगैरे मुळे लवकर खराब होतात पण लग्नकार्य, समारंभ वगैरे प्रासंगिक वापरल्यास 3/4 वर्षापेक्षा जास्तकाळ जसेच्या तसे रहातात. वापरात नसताना हवेशी संर्पक येणार नाही अशा पध्दतीने प्लास्टिक पिशवीत गुंडाळून ठेवावेत. जुन्या टूथब्रशच्या साह्याने हे दागिने स्वच्छ पाण्याने साफ होतात.
गुहागरमध्ये 7 मार्च ते 8 मार्च या काळात होणाऱ्या भव्य प्रदर्शनात हे सर्व दागिने पहाण्याची संधी तालुकावासीयांना मिळणार आहे. तेथे विक्रीसाठीही हे दागिने उपलब्ध आहेत. त्यामुळे गुहागर तालुकावासीयांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी. असे आवाहन यावेळी सौ. तनया पेठे यांनी केले आहे.