छञपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी गुहागर दणाणले, किल्ल्यावर फडकले भगवे ध्वज
गुहागर, ता. 20 : छ. शिवाजी महाराज की जय.., जय भवानी जय शिवाजी…, संभाजी महाराज की जय… घोषणांनी गुहागर, शृंगारतळी व अंजनवेल परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम शिवप्रेमी यांच्यावतीने शिवजयंती उत्सवानिमित्ताने गुहागर छ. शिवाजी महाराज चौक ते किल्ले गोपाळगड अशी भव्य शिव पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूक रॅलीला शिवप्रेमी यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी किल्ले गोपाळगडावर असंख्य शिवप्रेमींच्या उपस्थितीत भगवे ध्वज फडकविण्यात आले. तर दुर्गा भवानी व शिव पादुका भेट आणि 101 महिलांनी दुर्गा मातेचे औक्षण सोहळा सर्वांचे आकर्षण ठरले. Shivjanmatsava at Gopalgad


सकाळी शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि श्रीफळ वाढवून मिरवणूकीला प्रारंभ झाला. त्या आधी साई मंदिर येथे शिव पादुकांची राजेंद्र आरेकर यांनी पूजन केले. या मिरवणुकीत तालुक्यातील शेकडो नागरीक, शिवप्रेमी व शालेय व महाविद्यालय विद्यार्थी, शिक्षक, गुहागर पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. गुहागर येथून निघालेली शिव मिरवणूक गुहागर बाजारपेठ मार्गे श्री देव व्याडेश्वर मंदिर, वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात आगमन झाले. याठिकाणी ब्रह्मवृंदाच्या मंत्रोघोषात पूजन व जगदंबेची भेट झाली. यावेळी परिसरातील 101 महिलांनी देवीचे औक्षण केले. सर्वांसाठी देवस्थाच्या वतीने प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. अंजनवेल गोपाळगड येथे स्थानिक ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावरील गीतावर नृत्य व पोवाडे सादर केले. यावेळी पादुका पूजन व ध्वजारोहन करून शिवजयंती उत्सवाची सांगता करण्यात आली. Shivjanmatsava at Gopalgad


या शिव जन्मोत्सव सोहळ्यासाठी शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, सेक्रेटरी निलेश गोयथळे, खजिनदार गणेश धनावडे, संचालक संतोष वरंडे, राजेंद्र आरेकर, विकास मालप, सुधाकर कांबळे, अंकुश विखारे, अलंकार विखारे, सिद्धीविनायक जाधव, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, चंद्रकांत कारंडे, राजकुमार धायगुडे, राजन दळी, अजय खाडे, आमिष कदम, संदीप मांडवकर, मनसेचे तालुका संपर्क प्रमुख प्रमोद गांधी, राहुल कनगुटकर, शामकांत खातू, डॉ. मंदार आठवले, लायन्स क्लबचे अध्यक्ष अनिकेत गोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी घनश्याम जांगिड, दीपक कनगुटकर, बाबासाहेब राशिनकर, सोहम सातार्डेकर, आत्माराम मोरे, अंजनवेल सरपंच सोनल मोरे, नंदकुमार खेतले, विवेक खेतले, उदेश सावंत, समीर धामणस्कर आदींसह अनेकांनी मेहनत घेतली. तसेच तालुक्यातील असंख्य शिवभक्त गुहागरवासीय उपस्थित होते. या संपूर्ण शिवरथ यात्रेसाठी पोलीस प्रशासनाने चांगले सहकार्य केले. Shivjanmatsava at Gopalgad