कन्हैया स्टार कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आयोजित
गुहागर, ता. 19 : शहरातील कन्हैया स्टार कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आयोजित पाच दिवस चालणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सदरील स्पर्धा 19 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. Launch of Kanhaiya Star Cricket Tournament
या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत व नगरपंचायत मर्यादित ही स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १५०१५/- व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ११०११/- रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, अंतिम सामना सामनावीर, उगवता तारा अशी आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.


या उद्घाटन कार्यक्रमाला स्वर्गीय सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहिल आरेकर, श्रीधर बागकर, दिलीप गोयथळे, मुरलीधर गोयथळे, संतोष वराडकर, शोधन वराडकर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी कन्हैया स्टार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मनीष गोयथळे, श्रीरंग वराडकर, सुनील वराडकर, सिद्धार्थ वराडकर, अनिकेत वराडकर, तेजस वराडकर, सिद्धेश आरेकर, राजा आरेकर मेहनत घेत आहेत. Launch of Kanhaiya Star Cricket Tournament