• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 August 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गितेश मुरटे गळफास प्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल

by Guhagar News
February 11, 2025
in Guhagar
411 4
0
Case registered in Gitesh Murte hanging case
807
SHARES
2.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकण एलएनजीच्या अधिकऱ्यासह दोन कामगारांचा सामावेश

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील कोकण एलएनजीमध्ये पॅन्ट्री विभागात सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या गितेश मुरटे यानी गळफास लावुन केलेल्या आत्महत्येप्रकरणी कोकण एलएनजीच्या अधिकाऱ्यासमवेत दोन कामगार असे तीघांवर गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सदर घटना घडली होती. Case registered in Gitesh Murte hanging case

तालुक्यातील अंजनवेलमधील कोकण एलएनजीमध्ये आत्महत्या करणारा गितेश विलास मुरटे, वय ३१, मुळ राहणार अंधेरी इस्ट, मुंबई. नोकरीनिमित्त गुहागर बाग येथे भाडयाच्या घरामध्ये रहात होता. दरम्यान ११ नोव्हेंबर २०२४ रोजी त्याने भाडयाच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्याचा भाऊ श्रीकांत विलास मुरटे याने गुहागर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार या घटनेचा पोलिस उपनिरिक्षक सुजित सोनावणे अधिक तपास करत होते. या तपासामधुन मयत गितेश मुरटे याला आत्महत्या करण्यास प्रेरीत केले म्हणून या तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Case registered in Gitesh Murte hanging case

यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामधील कोकण एलएनजीमधील अधिकारी कुमार स्वामी बटुला, वय ५३, राहणार आरजीपीपीएल कॉलनी, राहुल रघुनाथ रहाटे, वय ३४, राहणार जानवळे, साहील संतोष महाडीक, वय २५, राहणार पालपेणे यांनी मयत गितेश मुरटे याला शुल्लक कारणावरून तसेच कामाचे प्रेशर टाकून मानसिक त्रास दिल्याने तसेच आरोपी दोन व तीन यांनी मयताला वारंवार उद्धटपणे बोलून आणि स्थानिक राजकारणीद्वारे दबाव टाकून मानसिक त्रास देवून आत्महत्या करण्यास प्रवृत्ती केले. असे नमुद केले आहे. यामध्ये फिर्यादीला भावनिक धमक्या येत होत्या. यामुळे सदर फिर्याद विलंबाने देण्यात आले असल्याचे म्हटले आहे. वरील तीनही आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम १०८, ११५ (२), ३ ( ५ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Case registered in Gitesh Murte hanging case

Tags: Case registered in Gitesh Murte hanging caseGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share323SendTweet202
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.