विक्रांत जाधव : कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणे कंपन्यांना बंधनकारक
गुहागर, ता. 07 : कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अशावेळी जिल्ह्यातील अनेक कंपन्यांनी त्यांच्याकडे आरोग्य यंत्रणा नसताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोविड केअर सेंटर उभी केली. आरजीपीपीएलकडे तर स्वत:चे आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे 50 जणांचे कोविड केअर सेंटर उभे करणे कंपनीला सहजशक्य आहे. तालुका प्रशासनाला दाद दिली नाही तर मग आम्हाला वेगळ्या प्रकारे त्यांच्याशी बोलावे लागेल. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आढावा बैठकीत केले. Z P President Vikrant Jadhav Said : Corona is spreading rapidly. Many companies in the district set up covid care centers for the safety of their employees when they did not have a health system. RGPPL has its own Medical center. Therefore, it is easy for the company to set up a 50-person covid care center.


गुहागर तालुक्यातील कोरोनाचा आढावा घेताना रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाच्या कोविड केअर सेंटरचा विषय निघाला. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी कंपनीत कोविड केअर सेंटरची सुविधा निर्माण करण्याबाबत सूचना दिल्याचे सांगितले. मात्र बैठकीत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आरजीपीपीएल कोविड केअर सेंटर उभे करण्याबद्दल उत्सुक नसल्याचे सांगितले. त्यावर अधिकाऱ्यांशी बोलताना विक्रांत जाधव म्हणाले की, रत्नागिरीमधील गद्रे मरीन कंपनीने कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. त्यांच्याकडे आरोग्यविषयक सुविधा नव्हती. कंपनीमध्ये 1800 कर्मचारी आहेत. यातील अनेक कर्मचारी गद्रे मरीनमध्ये ठेकदारी स्वरुपात काम करतात. तरीही कंपनीने डॉक्टर, नर्सेस, सर्पोटीव्ह स्टाफ यांची व्यवस्था करुन कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध केली आहे. तेथे 60 बेडची व्यवस्था आहे. आरजीपीपीएलकडे मुबलक जागा आहे. त्यांचे स्वत:चे आरोग्य केंद्र आहे. तेथे 2 डॉक्टर, नर्स, अन्य स्टाफ आहे. कोविड केअर सेंटर म्हणजे रुग्णालय नव्हे. आज त्या परिसरात तीन मोठ्या कंपन्या आहेत. त्यांची एकूण कर्मचारी संख्या 1500 पेक्षा नक्कीच जास्त असेल. त्यामुळे कंपनी परिसरात कोविड केअर सेंटरची सुविधा उभी करावीच लागेल. तेथे किमान 50 बेड उपलब्ध करावेच लागतील. कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व प्रकारातील कर्मचाऱ्यांना कोविड केअरची सुविधा पुरविण्याची जबाबदारी या कंपन्यांना घ्यावीच लागेल. तसे बंधन शासनानेच घालून दिले आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने थेट अधिकाऱ्यांशी बोलून कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत पत्र द्यावे. तरीही कंपन्यांनी सेंटर सुरु केले नाही तर जिल्हा प्रशासनाला त्यांच्याकडे बोलणी करावी लागतील. भविष्यात येणारी तिसरी लाट लक्षात घेवून अशा सुविधा आपल्याला तालुक्यात उभ्या कराव्या लागतील. केवळ कंपनीतच नव्हेतर आबलोली आणि शृंगारतळीमध्येही कोविड केअर सेंटर उभे करण्यासंदर्भात आपण तयारी सुरु केली आहे.


अँटीजेन तपासणी सुविधा नाही
सध्या आरजपीपीएल प्रशासन कोरोना सदृष्य लक्षणे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तालुक्यातील तपासणी केंद्रावर पाठवत आहे. आरजीपीपीएलने कोविड केअर सेंटरबरोबर ॲन्टिजेन तपासणीही सुरु करावी. त्यासाठी ॲन्टिजेन किट त्यांनी त्यांच्या निधीतून विकत आणावित. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलणी करावीत. अशी विनंती जिल्हा परिषद अध्यक्षांना अधिकाऱ्यांनी केली.


रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या दौऱ्यात आज काय घडले ते वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
टँकर नाही म्हणून पाणीच पुरवणार नाही का
जिल्हा परिषद अध्यक्षांनी गुहागर केले लसीकरण
आरजीपीपीएलला कोविड सेंटर करावेच लागणार
माझी रत्नागिरी अभियानामुळे प्रादुर्भाव कमी होईल