• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी अर्ज करा

by Guhagar News
February 7, 2025
in Ratnagiri
65 1
0
128
SHARES
367
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सहायक आयुक्त दीपक घाटे

रत्नागिरी, ता. 07 : सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव येथे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण दीपक घाटे यांनी केले आहे. Apply for Social Justice Department Awards

सामाजिक न्याय विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू-फुले-आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार यांचे नावाने पुरस्कार देवून व्यक्ती व संस्थांना सन्मानपूर्वक गौरविण्यात येते. Apply for Social Justice Department Awards

शासनाने सन २०२३-२४ या वर्षातील ६ पुरस्कारांची दि. १ फेब्रुवारी रोजी परिपूर्ण जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र सन्माननीय व्यक्ती व संस्थांनी दि. १५ फेब्रुवारीपर्यंत आपले विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव, ता. जि. रत्नागिरी (दूरध्वनी क्र. ०२३५२-२३०९५७) येथे सादर करावेत. यानंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. Apply for Social Justice Department Awards

Tags: Apply for Social Justice Department AwardsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share51SendTweet32
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.