• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 July 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भरारी पथकांची परीक्षा केंद्रांना भेट

by Mayuresh Patnakar
February 5, 2025
in Ratnagiri
206 2
0
Bharari teams visit the exam centers
404
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गैरमार्ग आढळल्यास केंद्रांची मान्यता कायमची रद्द; जिल्हाधिकारी

रत्नागिरी, ता. 05 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) दि. ११  फेब्रुवारी ते १८ मार्च व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) दि. २१ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील परीक्षा केंद्र असलेल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना भरारी पथके भेट देणार आहेत. ज्या केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील, त्या केंद्रांची परीक्षा मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष एम देवेंदर सिंह यांनी दिला आहे. Bharari teams visit the exam centers

जिल्ह्यातील परीक्षांचे संचलन सुयोग्य व परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष श्री. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. या बैठकीस पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार,  शिक्षणाधिकारी प्राथमिक बी. एम. कासार, शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार, शिक्षणाधिकारी माध्यमिक सुवर्णा सावंत आदी उपस्थित होते. Bharari teams visit the exam centers

Big boost to Maharashtra's development

जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, (इ. १२वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्र परिसरातील १ कि. मी. च्या आतमधील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवावीत. तसेच परीक्षा केंद्र असलेल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात वर्ग खोल्यांमध्ये व शालेय आवारात चालू स्थितीतील सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असून  आहेत.  ३० दिवस बॅकअप राहील याची व्यवस्था करणे किंवा १५ दिवसांनी बॅकअप काढून घेवून जतन करणे आवश्यक आहे. Bharari teams visit the exam centers

परीक्षा केंद्र असलेल्या शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयात, वर्गखोल्यांमध्ये व शालेय आवारात चालू स्थितीतील सीसीटीव्ही कॅमेरे बसवून  जिल्ह्यातील सर्व केंद्रांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करावी. ज्या केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या परीक्षा केंद्रांची मान्यता पुढील वर्षापासून कायमची रद्द केली जाईल.तसेच देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्‍यांचा वापर करावा. तसेच ड्रोनव्दारे केलेले रेकॉर्डींग जतन करून ठेवावे. Bharari teams visit the exam centers

शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती सावंत यांनी यावेळी माहिती दिली. जिल्ह्यात ३८ परीक्षा केंद्रांवर १६ हजार ५४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) लेखी परीक्षा-दिनांक २१ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च या कालावधीत होत आहे. जिल्ह्यात ७३ परीक्षा केंद्रांवर १८ हजार ३८८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, (इ. १२वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी, १३ परिरक्षक कार्यालय आहेत. Bharari teams visit the exam centers

Tags: Bharari teams visit the exam centersGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share162SendTweet101
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.