गुहागर, ता. 03 : गुहागर तालुका शिंपी समाजातर्फे सोहम बावधनकर याचा नूकताच सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्यावतीने ‘जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान ‘ या उपक्रमातर्गत घेण्यात येणाऱ्या नासा / इस्रो भेट निवड परीक्षेत जीवन शिक्षण शाळेतील सोहम बावधनकर या विद्यार्थ्यांची नासा ( अमेरिका, अंतराळ संशोधन केंद्र )दौऱ्यासाठी निवड झाली आहे. गेल्या वर्षी याच कार्यक्रमांतर्गत इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन भेटीसाठी निवड झाली होती. Soham Bavdhankar felicitated by Shimpi Samaj
सोहम याची यावर्षी समग्र शिक्षा विज्ञानविष्कार अभियान या उपक्रमांतर्गत राज्यअंतर्गत अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यामध्ये 18 व्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाला होता. त्याची जवाहरलाल नवोदय विद्यालय पडवे राजापूर येथेही त्याची निवड झाली होती. या कार्यक्रमासाठी अध्यक्षा रेश्मा बारटक्के, मनाली बावधनकर, मानसी बावधनकर, भाग्यश्री बारटक्के, उमा बारटक्के, मृण्मई बारटक्के, कामिनी बावधनकर, सई बावधनकर, स्नेहा बारटक्के, नीता बारटक्के, प्रिया बावधनकर या उपस्थित होत्या. Soham Bavdhankar felicitated by Shimpi Samaj