गुहागर, ता. 18 : तालुक्यातील अडूर ग्रामपंचायतच्या वतीने दि. १७ जानेवारी रोजी अडूर बाजारपेठ येथील जुनी सहाण येथे वॉटर एटीएम मशीनचा शुभारंभ करण्यात आला. गुहागर तालुक्यात येणारे पर्यटक, नागरिकांना तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विनासायास उपलब्ध व्हावे, यासाठी अडूर ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगातून वॉटर एटीएम मशीन बसविली आहे. Launch of water ATM machine at Adur


वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करून देणारी अडूर ग्रामपंचायत ही गुहागर तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे. या वॉटर एटीएम सुविधेचा शुभारंभ सरपंच शैलजा ताई गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना, तसेच विशेषत: पर्यटकांना स्वच्छ पिण्याचे पाणी विनासायास व अल्प किमतीत उपलब्ध व्हावे, यासाठी अडूर ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यात नियोजन केले होते. Launch of water ATM machine at Adur


आज बाजारात वीस रुपये लीटर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचा दर आहे. मात्र अडूर ग्रामपंचायतने एक रुपया मध्ये एक लीटर व पाच रुपयामध्ये दहा लिटर पाणी असे माफक दर ठेवलेले आहेत. अडूर ग्रामपंचायतीमध्ये सर्वच पक्षाचे सदस्य व ग्रामस्थ विकास कामांसाठी संघटितपणे प्रयत्न करीत असल्याने नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी कटिबद्ध आहोत असे सरपंच शैलजा ताई गुरव यांनी सांगितले. Launch of water ATM machine at Adur