क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम दि. १२ ते १३ जानेवारी २०२५ रोजी
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील जानवळे प्रिमियर लिग (पर्व सातवे) क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम दि. १२ ते १३ जानेवारी २०२५ रोजी होणार असून या क्रिकेट स्पर्धा जानवळे बौध्दवाडी क्रिकेट मैदान येथे होणार आहेत. रविवार दिनांक १२ जानेवारी सकाळी ८ वा. जानवळे प्रिमियर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे . त्यानंतर साखळी सामने, गुणवंतांचा गौरव व सत्कार करण्यात येणार आहे. Janwale Premier League starts
गावदेवी (ग्रामीण) विरुद्ध गावदेवी (मुंबई) हा विशेष सामना होणार आहे. या स्पर्धेमध्ये गावदेवी इलेव्हन (तेजस कोंडविलकर), शिव कमलेश्वर कृपा (अक्षय म्हादलेकर व सिद्धेश म्हादलेकर), खेमेश्वर कृपा (एकनाथ जांभळे,सुशांत कोळंबेकर), हयात नाईट रायडर्स (जुनेद घारे, सैफुला बरमारे), समता क्रिकेट (सागर जाधव व माजी सैनिक सुनील जाधव), श्रीवास पॅंथर (संदीप कुंडविलकर व महेंद्र महाडिक), श्री गणेश कृपा (ओमकार संसारे,मुसाफ, ठाकूर), श्री वाघजाई इलेव्हन (भरत शितप व अमोल शितप) आदी संघ सहभागी होणार आहेत. Janwale Premier League starts
या स्पर्धेदरम्यान दहावी बारावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे तसेच गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव जानवळे प्रीमिअर लीगच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी या क्रिकेट स्पर्धेचा सर्व क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जानवळे प्रिमियर लिग यांच्या वतीने करण्यात आले आहे. Janwale Premier League starts