• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्री सप्तेश्वर प्रतिष्ठानतर्फे वॉश उपक्रम

by Mayuresh Patnakar
January 11, 2025
in Guhagar
108 1
0
WASH activity by Shree Sapteswar Pratishthan
212
SHARES
606
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकाकोला कंपनीच्या वाय फोर डी फांऊडेशनचे साह्य

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील देवघर विद्यालयात पाणी, स्वच्छता आणि आरोग्य याविषयी जागृती करण्यात आली तसेच गावातील महिलांसाठी सक्षमीकरण आणि व्यवसाय मार्गदर्शन उपक्रम घेण्यात आला. हे दोन्ही उपक्रम श्री सप्तेश्वर प्रतिष्ठान देवघरने हिंदूस्तान कोका कोला बेव्हरेजीस्‌ Hindustan Coca-Cola Beverages (HCCB) या कंपनीच्या वाय फोर डी फांऊडेशनच्या (Y4D Foundation) मदतीने आयोजित केले होते. WASH activity by Shree Sapteswar Pratishthan

देवघर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित वॉश या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वत:चे व कुटुंबाचे आरोग्य उत्तम रहाण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात. घरातील स्वच्छता कशी ठेवावी. दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा अतिरिक्त वापर कसा करतो. काय केले तर पाण्याची बचत होईल. त्याचे फायदे काय. या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रोजेक्टरच्या साह्याने छायाचित्र, व्हिडिओद्वारे हे मुद्दे प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले. त्यामुळे पाणी, स्वच्छता आणि आरोग्य (वॉश) या संदर्भात कशी काळजी घ्यायची याचे आकलन विद्यार्थ्यांना झाले. यावेळी देवघर विद्यालयातील इयत्ता सातवी ते दहावी च्या 50 विद्यार्थिनींना Wash Kit  देण्यात आले.  या कीट मध्ये  साबण, सॅनिटायझर, सॅनिटरी पॅड, टुथब्रश, टुथपेस्ट, मास्क, आदी साहित्य आहे. WASH activity by Shree Sapteswar Pratishthan

WASH activity by Shree Sapteswar Pratishthan

विद्यालयातील कार्यक्रमानंतर देवघर गावातील बचतगटांच्या महिला सदस्यांसाठी विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबीरामध्ये वॉश या उपक्रमाविषयी मागदर्शन करण्यात आले. तसेच बचतगटांनी व्यवसायाभिमुख व्हावे. महिलांना शिवणकामाची रुची असेल तर प्रशिक्षण आणि शिवणयंत्र देण्यात येतील. महिलांना घरगुती पध्दतीने निर्रजंतूक सॅनिटरी पॅट बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाई. स्वयंपाकाची रुची असलेल्यांना मसाला उत्पादनांसाठी मार्गदर्शन केले जाईल. बचतगटांच्या उत्पादनानंना बाजारपेठत माल विकण्यासाठी देखील मदत केली जाईल. अशी माहिती उत्तम जाधव यांनी दिली. गावातील 60 महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाला देवघरमधील महिला ग्रामसंघाच्या प्रमुख, बचत गटांच्या महिला,  आशासेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. WASH activity by Shree Sapteswar Pratishthan

या दोन्ही कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी कोका कोला कंपनीच्या अंतर्गत सीएसआर नियोजन करणाऱ्या वाय फोर डी फाऊंडेशनचे (Y4D Foundation) उत्तम जाधव आणि महेश राठोड श्री सप्तेश्वर प्रतिष्ठान देवघरचे अध्यक्ष सागर गुजर, चव्हाण सर,  भरत गुजर,  मंदार कदम , विश्वजीत कदम,  कल्पेश गुजर,  ऋग्वेद सकपाळ,  ध्रुव सकपाळ,  सर्वेश घाणेकर,  यश गुजर, उपस्थित होते. तसेच महिला ग्रामसंघ प्रमुख, सर्व बचत गट च्या महिला,  आशासेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. WASH activity by Shree Sapteswar Pratishthan

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWASH activity by Shree Sapteswar Pratishthanगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share85SendTweet53
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.