रत्नागिरी, ता. 11 : सध्या कॉर्पोरेट क्षेत्रात चढाओढ सुरू आहे. विद्यार्थ्यांनी प्लेसमेंट सेलचे विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांना मानसिकतेत बदल करून प्रतिसाद द्यावा, असे प्रतिपादन गोगटे- जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालयाचे बी.एम.एस. विभाग व प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. रुपेश सावंतदेसाई यांनी केले. भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात प्लेसमेंट सेलचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. Inauguration of Placement Cell in Dev College
त्यांनी प्लेसमेंट सेलचे कार्य, प्लेसमेंट सेल समोरील आव्हाने, नोकरी शोधत असताना विद्यार्थ्यांची भूमिका नेमकी काय असावी, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनी विविध अनुभवही सांगितले. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्लेसमेंट सेल व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लेसमेंट सेल या विभागाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले. प्लेसमेंट सेल विभाग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करतो. Inauguration of Placement Cell in Dev College
प्लेसमेंट सेलच्या समन्वयक प्रा. आरती पाध्ये यांनी प्रास्ताविक केले. त्यामध्ये या विभागाचा उद्देश व कार्य नमूद केले. त्यानंतर डॉ. सावंतदेसाई यांनी प्लेसमेंट सेलचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करुन विद्यार्थ्यांना त्यासंबंधीचे मोलाचे मार्गदर्शन केले. प्र. प्राचार्य मधुरा पाटील यांनी प्लेसमेंट सेलला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे विद्यार्थी व इतर प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्लेसमेंट सेलच्या सदस्या प्रा. गौरी बोटके यांनी केले. प्रा. वैभव कीर यांनी आभार मानले. Inauguration of Placement Cell in Dev College