• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सरकारी वकील लाचलुचपतच्या जाळ्यात

by Mayuresh Patnakar
January 10, 2025
in Guhagar
163 2
0
Government prosecutor in the net of bribery
321
SHARES
916
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूणमध्ये दीड लाखाची लाच स्वीकारताना पकडले

रत्नागिरी, ता. 10 : आरोपीची उलट तपासणी न करण्यासाठी लाच मागितल्याने खेडमधील सरकारी वकिलला चिपळूणमध्ये लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी यांना तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी ताब्यात घेतले. Government prosecutor in the net of bribery

चिपळूण येथील ओयासीस हॉटेल येथे दिनांक गुरुवारी 9 जानेवारी 2025 रोजी रात्री 7.17 वाजता रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता.खेड, जि. रत्नागिरी यांनी ५,००,००० रुपयांची मागणी केलेली लाच रक्कम होती आणि स्वीकारलेली लाच रक्कम १,५०,००० रुपये होती. Government prosecutor in the net of bribery

याबाबत सविस्तर असे की,
यातील तक्रारदार यांनी घरडा कंपनीच्या केसमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वर्ग १, खेड यांचे न्यायालयात वकीलपत्र घेतलेले आहे. सरकार पक्षाच्यावतीने सदरची केस श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता हे पाहात होते. दिनांक २६ डिसेंबर २०२४ व दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक राजेश जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे साक्षीदारांना शिकवणार नाही, तुमची केस कशी सुटेल, असे प्रयत्न करेन, जास्त उलट तपास न घेता महत्वाचे मुद्दे वगळून आरोपी निर्दोष कसे सुटतील व केस लवकर संपवायला मदत करण्यासाठी ५,००,००० रुपयांची मागणी करुन त्यापैकी पहिला हप्ता म्हणून १,५०,००० रू. स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झालेले होते. त्यानंतर दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी सापळ्याचे आयोजन करुन लोकसेवक राजेश जाधव यांना तक्रारदार यांच्याकडून १,५०,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे. Government prosecutor in the net of bribery

Tags: Government prosecutor in the net of briberyGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share128SendTweet80
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.