आमदार जाधव; मुस्लिम समाजाच्या पाठिंब्यानेच माझा विजय झाला
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 10 : मी कधी कुठल्या समाजाचा व्देष केला नाही कधी कुठल्या धर्माबद्दल वाईट चिंतले नाही किंवा वाईट बोललो नाही की कुठच्याही समाजाची विकास कामे केली नाही, सर्व समाजाचा आदर केला सर्व समाजाला बरोबर घेऊन विकास कामे केली, मी कधीही माझ्या संपूर्ण जिवनात जाती पातीचे राजकारण केले नाही, गेले तीन टर्म गुहागर तालुक्याचा आणि मतदार संघाचा विकास केला, तरी हि मला मतदान कमी झाले पण माझ्या मुस्लिम समाजाने मला जाहीर पाठिंबा दिला. नुसता पाठिंबा दिला नाही तर मतदानाद्वारे माझा विजय निश्चित करुन माझ्या विजयावर शिक्का मोर्तब केले. त्यामुळे मी विजयी झालो हा विजय माझा नसून या विजयाचे खरे शिल्पकार हे मुस्लिम मतदार आहेत त्यामुळे मुस्लिम समाजाच्या मताधिक्याच्या पाठिंब्यानेच माझा विजय झाला, असे स्पष्ट प्रतिपादन उबाठा पक्षाचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी केले. MLA Jadhav felicitated by Muslim community
गुहागर तालुका महाविकास आघाडी मुस्लिम समाजातर्फे १९ गावांच्या वतीने आमदार भास्करशेठ जाधव यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाबिर भाई साल्हे होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार भास्करशेठ जाधव यांनी मुस्लिम समाजा बद्दल आदर व्यक्त करुन मी तुमचा कायम ऋणी राहिन, अशी सदभावना व्यक्त करुन बौध्द समाजाने हि माझ्याकडे मतदानासाठी पाठ फिरवली. कोण तो वंचीत बहूजन आघाडीचा अण्णा जाधव ज्याला मी कधी बघीतले सुद्धा नाही तो माझ्यावर नको ते आरोप करतो मी बौद्ध समाजाच्या विरोधात कधी बोललो नाही मी बोललो असलो तर माझा व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवा जे मी केलेच नाही तरीही माझी बदनामी करुन मला या निवडणुकीत पाडायचा डाव होता. अगदी मराठा समाजासह मुस्लिम समाजाने तारले असा उल्लेख करुन भास्करशेठ जाधव यांनी मुस्लिम समाजाला धन्यवाद दिले व भाजपा सह शिंदे गटावर जोरदार टीका केली. MLA Jadhav felicitated by Muslim community
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शाबिर भाई साल्हे, माजी सभापती अब्बासशेठ कारभारी, फैसल भाई कासकर, इमरानशेठ घारे, लतीफशेठ लालू, संपादक निसारभाई सरगुरो, उद्योजक गुलामशेठ तांडेल, असिम साले, अ रहिमान घारे, न्यूर मोहम्मद काजी, शब्बीर माहिमकर, मजिद केलकर, इकबालशेठ घारे, सिराजभाई घारे, हुसेन बोट, मुबीन पेवेकर, नदीम काकडे फरिद चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपादक निसारभाई सरगुरो यांनी केले तर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच यासिन साल्हे यांनी सर्वांचे आभार मानले. MLA Jadhav felicitated by Muslim community