• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

२०२५ या वर्षात भारतात १० मोठ्या घडामोडी

by Guhagar News
January 1, 2025
in Bharat
96 1
1
Events happening in India in the year 2025
189
SHARES
539
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : या वर्षी दिल्ली आणि बिहार या दोन राज्यात विधानसभा निवडणुका महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये जनता दल बरोबर भाजपाची युती आहे. तर दिल्लीमध्ये आप विरोधात भाजपाने लढण्याची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये भाजपा सत्ता काबीज करण्याच्या तयारीत आहे. देशातील सहा राज्यात पोटनिवडणुका होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणुक होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत आहेत तर उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ६ राज्यातील पोटनिवडणुका महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. Events happening in India in the year 2025

प.बंगाल, उत्तरप्रदेश, जम्मू-काश्मिर, तामिळनाडू व गुजरात या राज्यात निवडणुका आहेत. प.बंगालच्या बशीरहाट लोकसभा जागेवर पोटनिवडणुक होणार आहे. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार हाजी नुरुल इस्लाम यांचे निधन झाल्याने ही निवडणुक आहे. उत्तरप्रदेशच्या अयोध्या जिल्ह्यात निलकीपूर येथे पोटनिवडणुक होणार आहे. येथील आमदार अवधेश प्रसाद आता सपाचे खासदार झाले आहेत. सपाने अवधेश यांचा मुलगा अजित याची उमेदवारी जाहीर केली आहे. जम्मू काश्मिरच्या बडगाम विधानसभेची पोटनिवडणुक होणार आहे. उमर अब्दुल्ला हे दुसर्‍या गांदरबल विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याने त्यांनी बडगामचा राजीनामा दिला. जम्मू-काश्मिरच्या नगरोटा तर गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील विसावदार तसेच तामिळनाडूतील इरोड पूर्व विधानसभा पोटनिवडणुक होणार आहे. केरळच्या देवीकुलम विधानसभा पोटनिवडणुक आहे. याशिवाय भारतीय जनता पार्टीला नव्याने राष्ट्रीय अध्यक्ष निवडावा लागणार आहे. Events happening in India in the year 2025

या वर्षाचे महत्त्व म्हणजे कर योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. अर्थमंत्र्यालयाने सरळ व सोप्या पद्धतीने आयकर दात्यांना कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आता जास्तीत जास्त लोक कर दाता क्षेत्रात आले आहेत. याची अंमलबजावणी सरकार करणार आहे. नव्या शोध पद्धतीने गुंतवणुक, स्थावर मालमत्ता, देणग्या, कमाईचे स्त्रोत यावर करआकारणी होणार आहे आणि देशाची जनगणना २०२५ मध्ये सुरु होत असून २०२६ पर्यंत होईल. देशातील सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सीमा आखण्याचे आदेश देण्यात आले होते. २०२५ पासून ते २०३९ पर्यंत जनरेशन बीटा म्हणून ओळखले जाणार आहे. या कालावधीत जन्माला येणार्‍या मुलांना जनरेशन बीटा नावाने ओळखले जाईल. २०२५ मध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन होणार आहे. १९ फेब्रुवारीपासून या स्पर्धा सुरु होतील. भारत यावर्षी महिला एकदिवशीय विश्‍वकप चे आयोजन करेल. भारत पहिल्यांदाच विश्‍व पेरा ऍथलॅटिंक चॅम्पियनशीपचे आयोजन करेल. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर पर्यंत नवी दिल्लीमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे. भारत यावर्षी निसार उपग्रह सोडून जगात मोठी क्रांती करणार आहे. निसार हे अंतराळ यान पृथ्वीवरील हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. Events happening in India in the year 2025

Tags: Events happening in India in the year 2025GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet47
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.