• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाचेरी सडा येथे केंद्रस्तरीय स्पर्धा संपन्न

by Guhagar News
December 27, 2024
in Guhagar
229 2
0
Center level competition at Pacheri Sada
450
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम,  आबलोली
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील मोंभार क्रीडानगरी, पाचेरी सडा येथे  सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्रिमूर्ती ग्रामविकास मंडळ, मुंबईकर पाणबुडीची लेकरं, सर्व पालक, सर्व ग्रामस्थ व शिक्षक वृंद पाचेरी सडा या सर्वांनी गेले आठ दिवस परिश्रम घेऊन मैदान तयारी, जेवण तयारी, तसेच पाण्याची व्यवस्था सर्व कामे चोखपणे बजावले.  एक आदर्शवत केंद्रस्तर क्रीडा स्पर्धेचे आयोजन कसे असावे याचा आदर्श घालून दिला. Center level competition at Pacheri Sada

पाचेरी सडा महिला मंडळ यांनी अतिशय मेहनत घेऊन दोन दिवस साधारण १४०० ते १५०० खेळाडू, शिक्षक, ग्रामस्थ तसेच पाहुणे मंडळी यांना चहा, नाष्टा व जेवण दिले याबद्दल सर्व महिला मंडळाचे कौतुक करण्यात आले. हा कार्यक्रमाला देणगी देणाऱ्या देणगीदारांचे शाळा व्यवस्थापन समिती तर्फे आभार व्यक्त केले. तसेच त्रिमूर्ती ग्रामविकास मंडळ , पाचेरी सडा यांच्या माध्यमातून भरघोस देणगी देऊन ग्रामस्थांनी एक आदर्शवत स्पर्धा घडवून आणली. या स्पर्धेसाठी उत्तम अशी इंद्रायणी साऊंड सिस्टीम व मंडप डेकोरेशन माजी सरपंच श्री. संतोषजी आंब्रे  यांनी उपलब्ध करून दिली. Center level competition at Pacheri Sada

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय वाघ यांनी त्रिमूर्ती ग्राम विकास मंडळ पाचेरी सडा चे सर्व मुंबईकर मंडळी, पालक वर्ग, महिला मंडळ, ग्रामस्थ पाचेरी सडा यांचे ऋण व्यक्त केले तसेच शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अनिलभाऊ जोशी यांनी देखील अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माजी सरपंच श्री. संतोषजी आंब्रे यांनी भूषविले व त्यांच्या अध्यक्षतेखाली या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे उपशिक्षक श्री. सचिन लबडे सर यांनी केले. Center level competition at Pacheri Sada

Tags: Center level competition at Pacheri SadaGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share180SendTweet113
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.